Diwali: दिवाळीच्या लाइटिंगसाठी भन्नाट जुगाड! कमी वीजेत घर होईल लख्ख, आणा ‘हे’ स्मार्ट गॅझेट
दिवाळीत घर सजवताना वीजबिल वाढण्याची चिंता सतावतेय? मग वापरा एक भन्नाट स्मार्ट गॅझेट! कमी विजेत घर उजळवण्याचा हा स्मार्ट जुगाड नेमका काय आहे? जाणून घ्या...

दिवाळीच्या आगमनासोबतच घराघरांत रोषणाई आणि सजावटीची धामधूम सुरू होते. बाल्कनी, गच्ची, दरवाजे आणि खिडक्यांवर लावलेल्या आकर्षक दिव्यांमुळे घराचा लूक खुलतो. मात्र, ही विद्युत रोषणाई सतत सुरू ठेवल्यास वीजवापर वाढून महिन्याच्या बिलाचा खर्चही वाढू शकतो. त्यामुळे काही स्मार्ट उपायांचा वापर करून दिवाळीचा झगमगाट कायम ठेवत विजेची बचतही करता येईल.
दिवाळीच्या रोषणाईसाठी LED सिरिज आणि LED बल्बची निवड करा. पारंपरिक फिलामेंट बल्बच्या तुलनेत LED दिवे 70 ते 80 टक्के कमी वीज खर्च करतात, त्यामुळे घराचा झगमगाट कायम ठेवत वीजबिलातही बचत करता येते.
दिवाळीत घर सजवताना प्रत्येक कोपरा दिव्यांनी उजळवण्यापेक्षा प्रवेशद्वार, बाल्कनी आणि देवघर अशा खास जागांवर लक्ष केंद्रित करा. मोजक्या दिव्यांची कल्पक मांडणी घराला आकर्षक लुक देईल आणि अनावश्यक वीजखर्चालाही आळा बसेल.
दिवाळीच्या रोषणाईत अनेकदा सजावटीचे दिवे रात्रभर सुरू राहतात आणि त्यामुळे विनाकारण वीज खर्च होते. त्यामुळे झोपण्यापूर्वी किंवा घराबाहेर पडताना दिवे बंद करण्याची सवय लावा आणि गरजेनुसारच प्रकाशाचा वापर करून वीजबिलाचा खर्च कमी करा.
दिवाळीच्या रोषणाईसाठी टाइमर सॉकेट किंवा स्मार्ट प्लगचा वापर करा आणि दिवे सुरू-बंद होण्याची वेळ आधीच निश्चित करा. यामुळे वारंवार स्विच बंद करण्याची गरज भासणार नाही आणि अनावश्यक वीज खर्चालाही आळा बसेल.
दिवाळीच्या रोषणाईसाठी नेहमी सुस्थितीतील आणि सुरक्षित वायरचा वापर करा. एका प्लगवर अनेक उपकरणे जोडणे टाळा, जेणेकरून शॉर्ट सर्किट किंवा आगीचा धोका निर्माण होणार नाही. यंदाच्या दिवाळीत घर सजवताना स्मार्ट पद्धतीने रोषणाई करा. या 4 सोप्या टिप्समुळे घराचा झगमगाट वाढेल आणि वीजबिलाचा खर्चही आटोक्यात राहील.