Travel Packing tips : ट्रिपला जाताना या वस्तू तुमच्या बॅगेत असल्याच पाहिजेत, अजिबात विसरु नका

Travel Packing tips : स्ट्रेस कमी करणं असो किंवा नवीन अनुभव. फिरणं उत्तम पर्याय आहे. ट्रॅव्हलिंगला जाण्याआधी तुमच्या बॅगेत काय-काय असलं पाहिजे जाणून घ्या.

| Updated on: Apr 11, 2026 | 4:15 PM
1 / 5
प्रवासाला जाताना या गोष्टी तुमच्या बॅगेत असल्याचं पाहिजेत. दुसऱ्या शहरात काय मिळेल, काय नाही हे सांगू शकत नाही. तुम्ही एकटे किंवा फॅमिली ट्रिपवर जात असाल तर काय वस्तू बाळगल्या पाहिजेत ते जाणून घ्या.

प्रवासाला जाताना या गोष्टी तुमच्या बॅगेत असल्याचं पाहिजेत. दुसऱ्या शहरात काय मिळेल, काय नाही हे सांगू शकत नाही. तुम्ही एकटे किंवा फॅमिली ट्रिपवर जात असाल तर काय वस्तू बाळगल्या पाहिजेत ते जाणून घ्या.

2 / 5

प्रवास हा मानसिक तणाव कमी करण्याची एक नैसर्गिक थेरेपी आहे. आयुष्य इतकं बिझी झालय की, लोक स्ट्रेसमध्ये असतात. मन ताजतवानं करण्यासाठी दर दोन महिन्यात एकदा फिरायला गेलं पाहिजे.

3 / 5

देशांतर्गत प्रवास करता असाल, तरी डॉक्यूमेंट्स शिवाय प्रवास करण्याची चूक करु नये. आधार कार्ड, ट्रॅव्हल इंश्योरेन्स, बोर्डिंग पास आणि हॉटेल बुकिंगशी संबंधित कागदपत्र जरुर स्वत: जवळ ठेवा.

4 / 5

कुठेही प्रवासाला जाताना स्वच्छता खूप महत्वाची असते.म्हणून टॉयलेटरीज किट तयार करा. त्यात हँड वॉश, टूथब्रश, फेस वॉश, सनस्क्रीन, मॉइस्चरायजर, शॅम्पू आणि डियो ठेवायला विसरु नका.

5 / 5

ऑनलाइन पेमेंटने बहुतांश व्यवहार होतात. पण थोडी कॅश बाळगणं सुद्धा गरजेच आहे. अनेक पर्यटन स्थळी स्थानिक ऑनलाइन पेमेंट घेत नाहीत. त्यावेळी कॅश उपयोगात येते. कार्ड्स आणि कॅश तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा. एकत्र ठेऊ नका.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us