24 वर्षांपूर्वी 13 कोटींना खरेदी केला, आता शाहरुखच्या ‘मन्नत’ बंगल्याची किंमत किती? ऐकून बसेल धक्का

शाहरुख खानचा 'मन्नत' हा अलिशान बंगला आहे. २४ वर्षांपूर्वी त्याने १३ कोटी रुपयांना खरेदी केला होता. आता या बंगल्याच्या किंमतीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

| Updated on: Feb 27, 2025 | 3:00 PM
1 / 5
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख 'मन्नत' हा बंगला सोडून कुटुंबीयांसोबत दुसऱ्या घरामध्ये शिफ्ट होत आहे. शाहरुखनने पाली हिल्स परिसरात दोम डुप्लेक्स अपार्टमेंट भाडेतत्त्वार घेतले आहेत. पण तुम्हाला मन्नत या बंगल्याची किंमत किती आहे हे माहिती आहे का?

2 / 5
शाहरुख खानच्या मन्नत या बंगल्याचे पहिले नाव  विला वियना होते. १९१४ साली हा बंगला उभारण्यात आला होता. हा बंगला एक ऐतिहासिक स्थळ म्हणून जवळपास एक दशक ओळखला जात होता.

3 / 5
शाहरुख खान १९९७ साली येस बॉस चित्रपटाचे बँडस्टँड जवळ शूट करत होता. तेव्हा त्याची नजर या बंगल्यावर पडली. त्यानंतर २००१मध्ये शाहरुखने हा बंगला खरेदी केला.

4 / 5
मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यावेळी किंग खानने हा बंगला केवळ १३ कोटी रुपयांना खरेदी केला होता. त्यावेळी ही रक्कम देखील खूप मोठी होती. शाहरुखने एका मुलाखतीमध्ये मन्नत ही सर्वात मोठी खरेदी असल्याचे म्हटले होते.

5 / 5
आज शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याची किंमत २०० कोटी रुपये झाली आहे. म्हणजेच २४ वर्षानंतर या घराची किंमत १५ पट वाढली आहे.