जरा डोकं चालवा… विमानाच्या खिडक्या नेहमी लंबगोलाकार का असतात ? 99 टक्के लोकांना माहीत नसेल हे कारण

जर तुम्ही विमानाने प्रवास केला असेल तर एक गोष्ट नक्कीच लक्षात आली असेल, ती म्हणजे विमानाची खिडकी. सहसा खिडकी चौकोनी असते, परंतु विमानात लंबवर्तुळाकार खिडक्या बसवल्या जातात. असं का असतं ? चला जाणून घेऊया..

| Updated on: Jun 19, 2025 | 2:33 PM
1 / 5
विमानाने प्रवास करताना बरेचदा अनेक लोकांना खिडकीजवळच्या सीटवर बसायला आवडतं. पण तिथे बसल्यावर अनेक लोकांच्या मनात खिडकीबद्दलचा विचार मनात येतो. सहसा खिडकी चौकोनी असते, परंतु विमानात बसवलेल्या खिडकीच्या बाबतीत असे होत नाही. विमानाची खिडकी ही लंबवर्तुळाकार आकारात असते. असं का असतं याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? याचे उत्तर हे विमानाच्या सुरक्षिततेशी संबंधित आहे. यामागचं नेमकं कारण काय ? चला जाणून घेऊया..

2 / 5
रीडर्स डायजेस्टमधील एका अहवालानुसार, विमानाच्या खिडक्या नेहमीच लंबवर्तुळाकार नसतात. 1950 सालापर्यंत, विमानाच्या खिडक्या चौकोनी आकाराच्या होत्या. त्या काळात विमाने आजच्यापेक्षा हळू आणि थोडी खाली उडत असत. मग तेव्हा चौकोनी असलेल्या खिडक्या आता लंबवर्तुळाकार आकारात का बदलल्या?

3 / 5
स्कॉट चीप फ्लाइटचे उत्पादन ऑपरेशन्स स्पेशालिस्ट विलिस ऑरलँडो म्हणतात की असे करण्याची अनेक कारणे आहेत. पहिले कारण विमानाच्या सुरक्षिततेशी संबंधित आहे. जेव्हा विमान आकाशात उडतं तेव्हा हवेचा दाब वाढतो. लंबवर्तुळाकार खिडकीमुळे, हा हवेचा दाब त्याच्या प्रत्येक भागावर समान रीतीने लागू होतो. जेव्हा असे होते तेव्हा खिडक्या तुटण्याचा धोका कमी होतो.

4 / 5
विलिस म्हणतात की आकाशात प्रवास करताना विमानाच्या आत आणि बाहेर हवेचा दाब खूप असतो. खिडक्या लंबवर्तुळाकार असल्याने, उड्डाणादरम्यान हवेच्या दाबात वारंवार बदल होत असल्याने खिडक्यांना नुकसान होण्याचा धोका जवळजवळ नसतो. याव्यतिरिक्त, विमानाचा वेग वाढतो आणि ते जास्त उंचीवर उडते तेव्हा हा दाब आणखी वाढतो.

5 / 5
1950 सालापूर्वी विमाने कमी वेगाने उड्डाण करत होती, ज्यामुळे जास्त इंधन लागत असे आणि ते महाग होते. विमान प्रवास अधिक लोकप्रिय होत असताना, इंधन खर्च कमी करण्यासाठी विमान कंपन्यांनी त्यांचा वेग वाढवला. वेग वाढल्यावर दाब कमी करण्यासाठी लंबवर्तुळाकार खिक्या बसवण्यास सुरुवात झाली. याचे आणखी एक कारण आहे. चौकोनी खिडक्यांपेक्षा लंबवर्तुळाकार खिडक्या अधिक सुंदर दिसतात. हा त्यांचा प्लस पॉइंट आहे.