स्कूल बस पिवळ्या रंगाची का असते ? तुम्हाला माहीत आहे का कारण ?

तुम्ही नेहमी पाहिलं असेल की शाळेची बस अर्थात स्कूल बस ही नेहमी पिवळ्याच रंगाची असते. ती कधीच गुलाबी किंवा लाल रंगाची नसते. स्कूल बसच्या पिवळ्या रंगाची असण्यामागे काही वैज्ञानिक आणि सुरक्षेची कारणे आहेत, ज्यामुळे तिचा रंग पिवळा असतो. पण ते कारण काय हे तुम्हाला माहीत आहे का ?

| Updated on: Jan 27, 2025 | 2:14 PM
1 / 6
लाल रंग खूपच गडद आणि दूरवरूनही स्पष्टपणे दिसतो. असे असतानाही स्कूल बसला लाल रंग दिला जात नाही. आता तुम्हाला माहीत आहे का शाळेच्या बसेस पिवळ्या का रंगवल्या जातात? पांढरे, पिवळे रंग याकडे डोळे सहज आकर्षित होतात. पिवळा हा असा रंग आहे जो कोणाचेही लक्ष वेधून घेतो. शाळेच्या बसेसकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांचा रंग पिवळा ठेवला जातो.

2 / 6
खरंतर, सुरक्षेच्या कारणास्तव स्कूल बसचा रंग पिवळा ठेवला जातो. असे मानले जाते की पिवळा रंग दुरूनही सहज दिसतो. तसेच,  पाऊस असो की धुकं, रात्र असो की दिवस, पिवळ्या रंगाची बस  सहज दिसते, त्यामुळे अपघाताचा धोका खूपच कमी असतो. सुप्रीम कोर्टाने स्कूल बससाठी विविध प्रकारची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, त्यानुसार सर्व शाळांना स्कूल बसला पिवळ्या रंगाने (Yellow Color) रंग देणे बंधनकारक आहे.

3 / 6
पिवळ्या बाजूची परिघीय दृष्टी लाल रंगापेक्षा 1.24 पट जास्त असते. तो डोळ्यांना सहज दिसतो. त्यामुळेच स्कूलबस रंगविण्यासाठी पिवळ्या रंगाचा वापर केला जातो.

4 / 6
शाळेची बस भाड्याने असेल तर त्यावर “स्कूल बस ड्युटी” लिहिणे आवश्यक आहे.

5 / 6
 बसमध्ये प्रथमोपचार पेटी अर्थात फर्स्ट एड बॉक्स  असणे आवश्यक आहे. तसेच शाळेशी संबंधित प्रत्येक माहिती बसमध्ये असावी.

6 / 6
बॅग ठेवण्यासाठी सीटमध्ये जागा असावी. मुलांसाठी अटेंडेंट नेमलेला असला पाहिजे. तसेच स्कूल बसचा वेग ताशी 40 किलोमीटरपेक्षा जास्त नसावा.