
जेव्हा आपण रेल्वे स्टेशनवर जातो, प्रवासात असतो, तेव्हा आपल्याला अनेक गाड्या जाताना दिसतात. गाडी पाहिल्यानंतर मनात अनेक प्रश्न येतात, काही प्रश्न गाडीच्या डब्याबद्दलही येतात. डब्याचा कोच, बोर्ड, क्रमांक, चाकांचा आकार इत्यादींबद्दल लोकांच्या मनात कुतूहल असतं. (all photo : PTI)

पण आज आपण कोणत्याही प्रवासी किंवा एक्सप्रेस ट्रेनबद्दल नाही, तर मालगाड्यांशी संबंधित एका रंजक गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत. मालगाडी अनेकांनी पाहिली असेलच, पण याच मालगाड्यांच्या डब्यांना चाकं का असतात? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का ?

मालगाडीच्या डब्याच्या बाजूला असलेल्या चाकाचा खास उपयोग असतो. ते (चाक) हँडब्रेक म्हणून काम करतं. हे चाक दिसायला स्टेअरिंग व्हीलसारखं असतं, परंतु मालगाडीचा डबा स्थिर असताना त्याचा वापर केला जातो, जेणेकरून तो आपोआप पुढे-मागे सरकू नये.

याचं काम कसं चालतं ? जेव्हा हे चाक (हँडल) घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवले जाते, तेव्हा त्याला जोडलेली साखळी आणि दांड्याची सिस्टीम डब्याच्या मुख्य चाकांना घट्टपणे लॉक करते.

ते कशासाठी बसवलं जातं? जेव्हा मालगाडीला स्टेशनवर किंवा लूप लाईनवर बराच वेळ थांबवावं लागतं, तेव्हा लोको पायलट किंवा गार्ड हे गाडी सुरक्षित ठेवण्यासाठी त्या चाकाचा वापर करतात, जेणेकरून डबा उलटून अपघात होऊ नये.

सुरक्षेसाठी अत्यावश्यक - खरंतर हे चाक एक इमर्जन्सी ब्रेकिंग प्रणाली म्हणून काम करतं, ज्यामुळे ट्रेन स्थित राहते.