
इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एकटे पडल्याचे दिसत आहे. सध्याच्या घडीला एकही देश त्यांची साथ देत नाही. थेटपणे मदत मागूनही कोणीही त्यांच्या मदतीला पुढे आले नाही.

यादरम्यानच डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे विधान केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, इराणचे नेते हिंसक आणि खूप जास्त घातक आहेत. त्यांनी तीन आठवड्यांमध्ये तब्बल 32 हजार लोकांचा जीव घेतला.

जर तुम्हाला वाटत असेल की, इराणजवळ परमाणु शक्ती असायला हवी तर हे लक्षात घ्या की, परमाणू शक्तीचा वापर करण्याकरिता त्या लोकांना एक घंटा किंवा एक दिवसही लागणार नाही.

हा धोका फक्त इस्त्रायलला नाही तर सर्वांनाच आहे. मिडल ईस्टलाही उडवून शकतात. अमेरिका आणि इराण सतत आरोप करत आहेत की, इराण परमाणू शक्ती तयार करत आहे.

युद्धात अमेरिकेकडून इराणच्या युरेनियन साठ्याला टार्गेट करण्यात आले. अनेक मोठे हल्ले इस्त्रायल आणि अमेरिका इराणवर करत आहे. 18 दिवस या युद्धाला पूर्ण झाली आहेत.