Drishyam 3: गायतोंडे आवडत नसेल पण..; विजय साळगावकरची वकील साकारणारी अभिनेत्री स्पष्टच बोलली..
‘दृश्यम 3’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. या चित्रपटातील कलाकार आणि त्यांच्या भूमिकांबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. दरम्यान, विजय साळगावकरची वकील गायत्रीची भूमिका साकारणारी अभिनेत्री संवेदना सुवलका हिची एक खास सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्टमुळे पुन्हा एकदा गायतोंडे हे पात्र चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. नेमकं काय आहे या पोस्टमागचं खास कारण? जाणून घ्या सविस्तर...

‘दृश्यम 3’ चित्रपटाची सध्या प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटातील कथानकासोबतच कलाकारांच्या अभिनयालाही प्रेक्षकांकडून पसंती मिळत आहे. विशेषतः लक्ष्मीकांत गायतोंडे हे पात्र पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहे.
अभिनेते कमलेश सावंत यांनी ‘दृश्यम’ चित्रपटात लक्ष्मीकांत गायतोंडे या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. पहिल्या भागापासूनच गायतोंडे विजय साळगावकर आणि त्याच्या कुटुंबासाठी अडचणी निर्माण करताना दिसला आहे. त्यामुळे या पात्राने प्रेक्षकांच्या मनात वेगळी छाप निर्माण केली आहे.
‘दृश्यम 3’मध्येही गायतोंडेच्या भूमिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. दरम्यान, विजय साळगावकरची वकील गायत्री ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री संवेदना सुवलकाने कमलेश सावंत यांच्यासोबतचे काही खास ऑफस्क्रीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या पोस्टची सध्या चर्चा होत आहे.
संवेदना सुवलकाने या फोटोंसोबत कमलेश सावंत यांच्या अभिनयाचे कौतुक करणारी खास पोस्ट लिहिली आहे. “गायत्रीला गायतोंडे कदाचित आवडत नसेल पण संवेदना मात्र त्यांची फॅन आहे,” अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमधून तिने पडद्यावरील पात्र आणि कलाकार यांच्यातील फरकही अधोरेखित केला आहे.
‘दृश्यम 3’मध्ये अजय देवगण, श्रिया सरन, इशिता दत्ता, मृणाल जाधव, तब्बू, रजत कपूर, प्रकाश राज आणि जयदीप अहलावत यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. हा चित्रपट सर्वांच्याच पसंतीस पडत आहे.