Drishyam 3: ‘दृश्यम 3’ची प्रतीक्षा संपली..; या दिवशी चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Drishyam 3 Release Date: मोहनलाल यांची मुख्य भूमिका असलेल्या 'दृश्यम 3' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. अखेर निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार, ते जाणून घ्या..

| Updated on: Jan 15, 2026 | 3:30 PM
1 / 5
'दृश्यम' हा चित्रपट प्रत्येक भाषेत सुपरहिट ठरला आहे. जीतू जोसेफच्या मूळ मल्याळम चित्रपटात साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांची मुख्य भूमिका आहे. 'दृश्यम'चा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

2 / 5
मोहनलाल यांनी 'दृश्यम 3'चा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते जॉर्जकुट्टी नावाच्या एका टीव्ही केबल ऑपरेटरची भूमिका साकारत आहेत. चित्रपटाचं मल्याळम व्हर्जन हे हिंदी व्हर्जनच्या काही महिन्यांपूर्वी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

3 / 5
'दृश्यम 3'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करत मोहनलाल यांनी लिहिलं, 'वर्ष सरले, भूतकाळ नाही बदलला. दृश्यम 3 जगभरात 2 एप्रिल 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.' त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये एक जुना टेलिव्हिजन सेट, एक फावडा, पाण्यात बुडालेली कार, एक मोबाइल फोन, एक पिवळी बॅग, एक सीसीटीव्ही कॅमेरा आणि एक स्क्रिप्ट पहायला मिळतेय.

4 / 5
या सर्व गोष्टी पहिल्या दोन भागांच्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. यानंतर व्हिडीओत मोहनलाल कॅमेरासमोर थेट पाहताना दिसतात, त्यांच्या मागे त्यांची पत्नी रानी जॉर्ज (मीना) आणि अंजू-अनू या मुली (अंसीबा हसन आणि एस्थर अनिल) दिसत आहेत. 'भूतकाळ कधीच शांत बसत नाही', अशी या चित्रपटाची टॅगलाइन आहे.

5 / 5
चित्रपटाच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर पोस्टर जारी करत लिहिलंय, 'प्रत्येक गुपिताची एक तारीख असते. 2 एप्रिल 2026 - सत्य समोर येईल.' या चित्रपटाचं दिग्दर्शन जीतू जोसेफ यांनी केलंय. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात 'दृश्यम 3'च्या हिंदी व्हर्जनच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली होती. 2 ऑक्टोबर 2026 रोजी अजय देवगणचा हिंदी व्हर्जन प्रदर्शित होणार आहे.