
राज्यात अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण आणि भिंवडी परिसरात मुसळधार पाऊस बघायला मिळत आहे. तसेच काही ठिकाणी तुरळक रिमझिम पाऊस सुरु आहे.

भिवंडी शहरात पावसाने दमदार हजेरी लावलीय. सकाळपासूनच भिवंडी शहरामध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे.

मुसळधार पावसामुळे भिवंडी शहरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली असून पावसामुळे मुख्य बाजारपेठ आणि भाजी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

मुसळधार पावसामुळे बाजारपेठेत आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. तर ग्रामीण भागात पावसामुळे अनेक गावात वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे

मुंबईतील अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर शहरात मुसळधार पावसाची हजेरी लावली आहे. त्यामुळे वातावरणात बदल झाला असून गारवा निर्माण झाला आहे.