
डॉ. शिखा नेहरू शर्मा यांच्या मते, डाळिंबात पॉलीफेनॉल आणि प्युनिकलागिन असतात. हे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स प्रदूषण आणि सूर्यकिरणांमुळे होणाऱ्या मुक्त रॅडिकल्सशी लढतात.रॅडिकल्स पेशींना नुकसान पोहोचवून अकाली वृद्धत्व आणतात.

डाळिंब हे नुकसान टाळून सुरकुत्या आणि बारीक रेषा नियंत्रित करण्यास मदत करते. डाळिंबामध्ये व्हिटॅमिन सी देखील भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन सी कोलेजनचे उत्पादन वाढविण्यास मदत करते, जे त्वचेची लवचिकता सुधारण्यासाठी आवश्यक आहे.

डाळिंबामध्ये कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असते. त्यात प्रथिने, फोलेट, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी सारख्या आवश्यक पोषक तत्वांचा समावेश असतो.

लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्ताची कमतरता ग्रस्त लोकांसाठी डाळींब अत्यंत फायदेशीर आहे, कारण ते शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवते.डाळिंब केवळ त्वचेसाठीच नाही तर हृदय, मेंदू आणि पचनसंस्थेसाठी देखील लाभदायक आहे.

डाळिंबामुळे शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते. डाळिंब त्वचेच्या पेशींना आतून हायड्रेट ठेवते, नैसर्गिक ओलावा राखते आणि कोरडेपणा टाळते. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून ते मुरुमे आणि निस्तेजपणा कमी करण्यास मदत करते.