वैद्यकीय क्षेत्रात मोठा चमत्कार, आता घरबसल्या करता येणार हार्ट अटॅकचं निदान; कसं? जाणून घ्या

सोलापुरातील डॉ. गुरुनाथ परळे यांनी तयार केलेले ईसीजी जॅकेट हृदयविकाराचे त्वरित आणि अचूक निदान करण्यास मदत करते. हे जॅकेट ग्रामीण भागातही हृदयरोगाचे निदान सोपे करेल. केंद्र सरकारकडून या जॅकेटला आंतरराष्ट्रीय पेटंट मिळाले आहे.

| Updated on: Jul 20, 2025 | 11:33 AM
1 / 10
हृदयविकाराच्या वाढत्या धोक्यावर मात करण्यासाठी सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण संशोधन झाले आहे. सोलापुरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. गुरुनाथ परळे यांनी हार्ट अटॅकचे त्वरित आणि अचूक निदान करणारे ईसीजी जॅकेट तयार केले आहे.

2 / 10
या अनोख्या आणि क्रांतिकारी उपकरणाला केंद्र सरकारकडून आंतरराष्ट्रीय पेटंट मिळाले असून हे हृदय रुग्णांसाठी एक मोठे वरदान ठरणार आहे. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि सवयींमुळे तरुण वयातील व्यक्तींमध्येही हार्ट अटॅकचे प्रमाण वाढले आहे.

3 / 10
अनेकदा हृदयविकाराने होणाऱ्या मृत्यूंचे एक प्रमुख कारण म्हणजे वेळेवर निदान न होणे. हृदयविकाराचे निदान करण्यासाठी ईसीजी (ECG) ही सर्वात प्राथमिक आणि महत्त्वाची चाचणी आहे. परंतु, ग्रामीण भागात आणि दुर्गम ठिकाणी ईसीजी मशीन सहज उपलब्ध नसते. अशा परिस्थितीत रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत.

4 / 10
या गंभीर समस्येवर उपाय शोधण्यासाठी डॉ. गुरुनाथ परळे यांनी आपल्या तीस वर्षांच्या वैद्यकीय अनुभवाचा उपयोग केला. अनेक रुग्णांना छातीत दुखल्यानंतर वेळेत ईसीजी न मिळाल्याने किंवा त्याचे योग्य निदान न झाल्याने जीव गमवावा लागल्याचे त्यांनी पाहिले होते.

5 / 10
यामध्ये तरुणांची संख्या लक्षणीय होती. याच चिंतेतून त्यांनी रुग्णांना घरीच ईसीजी करता यावा या संकल्पनेतून या दिलासा ईसीजी जॅकेटची निर्मिती केली. डॉ. परळे आणि त्यांच्या टीमने 1,300 पेक्षा अधिक रुग्णांवर सखोल संशोधन करून या जॅकेटची निर्मिती केली आहे.

6 / 10
या संशोधनादरम्यान छाती आणि पोटावर विशिष्ट पॉईंट्स शोधण्यात आले. ज्याद्वारे काढलेला ईसीजी नेहमीच्या ईसीजी प्रमाणेच अचूक असेल. हे जॅकेट रुग्णाने परिधान केल्यानंतर, केवळ एका क्लिकवर ईसीजी अहवाल थेट रुग्णाच्या किंवा डॉक्टरांच्या मोबाईलवर पाठवता येतो.

7 / 10
विशेष म्हणजे, हार्ट अटॅकचे निदान करण्यासाठी आवश्यक असलेला 12 LEAD ECG या उपकरणाद्वारे करणे शक्य आहे. या संशोधनाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली आहे.

8 / 10
2020 मध्ये शिकागो येथे झालेल्या वर्ल्ड काँग्रेस ऑफ कार्डिओलॉजी इन अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी कॉन्फरन्समध्ये डॉ. परळे यांनी आपले संशोधन सादर केले होते. विविध अभ्यासांद्वारे हे पॉईंट्स नेहमीच्या ईसीजी पॉईंट्ससारखेच असल्याचे सिद्ध झाले आहे.

9 / 10
वैद्यकीय चाचण्या आणि काही परवानग्यांनंतर या उपक्रमाला नुकतेच आंतरराष्ट्रीय पेटंट मिळाले आहे. डॉ. गुरुनाथ परळे यांनी या जॅकेटला दिलासा ईसीजी जॅकेट असे नाव दिले आहे.  त्यांच्या मते, हे जॅकेट हृदय रुग्णांसाठी मोठा दिलासा ठरेल.

10 / 10
वेळेवर निदान होऊन अनेकांचे प्राण वाचण्यास मदत करेल. या संशोधनामुळे सोलापूरचे नाव वैद्यकीय क्षेत्रात उंचावले असून, डॉ. परळे यांचे कार्य कौतुकास पात्र आहे.