Eknath Shinde: आज आ धरतीने ऊपर आवीने मने…मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदे यांची गुजरातीतून भाषणाला सुरुवात

Eknath Shinde Gujarati: गुजरातच्या वडनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 76 व्या वाढदिवसा निमित्ताने 'सेवा संकल्प अभियान' आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते.

| Updated on: Sep 17, 2026 | 2:50 PM
1 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 76 वा वाढदिवस असून त्यानिमित्ताने गुजरातच्या  वडनगरमध्ये 'सेवा संकल्प अभियान' आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 76 वा वाढदिवस असून त्यानिमित्ताने गुजरातच्या वडनगरमध्ये 'सेवा संकल्प अभियान' आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

2 / 5

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चक्क गुजरातीमध्ये भाषणाची सुरुवात केली. "वडनगरनी धरतीना सपूत, देश अने दुनियाना लाडला बनी गया छे. आज आ धरती ऊपर आवीने गर्व अनुभवूं छूं," असे यावेळी त्यांनी म्हटले.

3 / 5

यावेळी शिंदे यांनी महाराष्ट्राच्या वतीने आणि साडेबारा कोटी जनतेच्या तसेच शिवसेनेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या 76 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

4 / 5

भाषणात एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, "एनडीएच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितल्याप्रमाणे, यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम म्हणजे 25 वर्षे त्यांना आपण मुख्यमंत्री आणि पंतप्रधानपदाच्या रूपात पाहणे आहे. ही गोष्ट आपल्या देशाचा अभिमान आहे."

5 / 5

भाषणात पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "मोदीजींच्या बाबतीत आम्ही वयाचे आकडे मोजतच नाही हो, तर त्यांच्या कर्तृत्वाच्या उंचीला आम्ही पाहतो. मोदीजींच्या कर्तृत्वाची गणना हिमालयाच्या उंचीने होत असते आणि जनतेप्रती त्यांचे कार्य हे अरबी समुद्राच्या खोली इतके मोजले जाते."

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us