इमरान हाश्मीचे हे गाणे अनेकांनी गुपचूप पाहिलं, थेट पाकिस्तानी गायकांनी गायले, आजही ट्रेंडमध्ये
बॉलिवूडचा बोल्ड अभिनेता म्हणून इमरान हाश्मी ओळखला जातो. त्याची अनेक गाणी हिट ठरली होती. मात्र, एक गाणे असे होते जे अनेकांनी Gfसोबत किंवा एकट्याने गुपचूप पाहिले आहे. आठवलं का ते गाणं?

इमरान हाशमी आणि मल्लिका शेरावत यांच्या ‘मर्डर’ सिनेमाने २००४ मध्ये खूप गाजावाजा केला होता. सिनेमातील रोमँटिक सीन्स आणि गाण्यांची त्यावेळी मोठी चर्चा झाली होती. त्यातील एक लोकप्रिय गाणं म्हणजे ‘कहो ना कहो’. हे गाणं आजही अनेकांच्या आवडीचे आहे. गर्लफ्रेंडसोबत किंवा एकट्यानेही अनेकदा ऐकले असेल, पण गाण्यातील काही ओळी समजत नसल्याचे अनेकांना जाणवते. विशेषतः ‘तमल्ली माक...’ ही लाइन आली की पुढचे शब्द समजणे कठीण जाते.
‘कहो ना कहो' या गाण्यातील काही ओळी अरबी भाषेतील आहेत. २००० मध्ये रिलीज झालेल्या एका प्रसिद्ध इजिप्शियन गाण्याशी याचा थेट संबंध आहे. ‘कहो ना कहो’मधील अरबी भाग ‘तमल्ली माक’ (Tamally Maak) या गाण्यातून घेतला गेला आहे.
‘तमल्ली माक’ हे इजिप्तचे लोकप्रिय गायक अमर दीआब (Amr Diab) यांनी २००० मध्ये सादर केलेले गाणं आहे. या गाण्याचे बोल अहमद अली मूसा यांनी लिहिले होते, तर संगीत शेरिफ टाग यांनी दिले होते. ‘तमल्ली माक’ या नावाचा अर्थ ‘नेहमी तुझ्यासोबत’ असा होतो. गाण्यातील ओळी प्रेम आणि विरहाच्या भावना व्यक्त करतात.
अनु मलिक यांनी ‘मर्डर’चे संगीत दिले होते. ‘कहो ना कहो’ गाणं पाकिस्तानी गायक अमिर जमाल, सईद कादरी आणि अमर दीआब यांनी गायले होते. इमरान हाशमी आणि मल्लिका शेरावत यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याने त्यावेळी खूप लोकप्रियता मिळवली.
‘कहो ना कहो’सोबतच सिनेमातील इतर गाणीही प्रेक्षकांना आवडली होती. त्यामुळे ‘मर्डर’च्या म्युझिक अल्बमची जवळपास २२ लाख युनिट्स विक्री झाली होती. २००४ मध्ये हा अल्बम सर्वाधिक विकल्या गेलेल्या चित्रपट संगीत अल्बममध्ये चौथ्या क्रमांकावर होता.