
सामुद्रिकशास्त्रानुसार व्यक्तीच्या चेहऱ्यावर अशा अनेक खुणा असतात, ज्यांचा त्या व्यक्तीच्या जीवनावर शुभ-अशुभ प्रभाव पडतो. काही लोकांच्या गालावर खळी पडते. जर तुमच्या किंवा तुमच्या गर्लफ्रेंडच्या गालावर खळी पडत असेल तर त्या व्यक्ती खरोखरच भाग्यवान असतात.

गालावर पडणारी खळी ही केवळ चेहऱ्याचे सौंदर्य वाढवत नाही, तर ती व्यक्तीच्या नशिबाशी आणि स्वभावाशी संबंधित अनेक गोष्टी दर्शवते. ज्या व्यक्तीच्या गालावर खळी पडते, ती व्यक्ती कोणालाही स्वतःकडे आकर्षित करू शकते. अशा व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. हे लोक अनेक लोकांमध्येही उठून दिसतात.

सामुद्रिक शास्त्रानुसार, ज्यांच्या गालावर खळी पडते, त्यांना आयुष्यात कधीही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही. त्यांना सहजपणे धनप्राप्ती होते. ते इतरांना मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असतात.

ज्या मुलींच्या गालावर खळी पडते, त्यांचे वैवाहिक जीवन खूप आनंदी असते. त्यांचे पती त्यांच्यावर खूप प्रेम करतात. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. अशा मुलींच्या आनंदी स्वभावामुळे त्या पतीला नेहमी आनंदी ठेवतात.

ज्या पुरुषांच्या गालावर खळी पडते, त्यांच्या पत्नीही भाग्यवान असतात. ते आपल्या पत्नीला नेहमी आनंदी ठेवतात. तिच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. त्यांचे वैवाहिक जीवनही सुखी असते.

ज्या लोकांच्या गालावर खळी असते, अशा व्यक्ती सौम्य, संवेदनशील आणि मनमिळाऊ स्वभावाच्या असतात. त्यांना कला क्षेत्रात विशेष रुची असते.

गालावर खळी असलेले लोक ते इतरांना मदत करण्यात नेहमी पुढे असतात. त्यांचे नशीब कायम त्यांच्या बाजूने असते. त्यांना प्रत्येक कामात यश मिळते.

गालावर खळी पडणे हे अनुवांशिक मानले जाते. ते पालकांकडून मुलांमध्ये येते. आपल्या गालांच्या स्नायूंमधील बदलांमुळे या खळी निर्माण होते. ज्या लोकांच्या गालांचे स्नायू इतरांपेक्षा लहान असतात, ज्याला 'जायगोमॅटिक्स' स्नायू म्हणतात, त्यांच्या गालांवर खळी पडते. त्यामुळे सगळ्यांच्या गालावर खळी दिसत नाही.