खरातला कुणीतरी आवरा रे! बलात्कारानंतर आणखी एक नवा कांड उघड, १२ वा गुन्हा दाखल, काय घडलं

लिंगपिसाट अशोक खरात प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी एक नवा गुन्हा दाखल झाला आहे. या वेळी खरातने एका व्यापाऱ्याला फसवल्याचे समोर आले आहे. आता नेमकं काय झालं आहे जाणून घ्या...

| Updated on: Apr 04, 2026 | 12:59 PM
1 / 5
भविष्य सांगण्याच्या नावाखाली अनेक महिलांचा लैंगिक शोषण करणारा नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी त्याच्याविरुद्ध नवा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे त्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांची एकूण संख्या १२ पर्यंत पोहोचली आहे. आता खरातने काय नवा प्रताप केला चला जाणून घेऊया...

2 / 5
एक कांदा व्यापारी अशोक खरातच्या जाळ्यात अडकला. खरातने व्यापाऱ्याला प्लॉट विक्रीच्या व्यवसायात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले. त्याने व्यापाऱ्याकडून ६० लाख रुपयांची जागा केवळ २२ लाख २५ हजार रुपयांत वृद्धाश्रमाच्या नावावर खरेदी केली. इतकेच नाही, तर खरातने व्यापाऱ्याला वृद्धाश्रमाच्या जागेच्या बदल्यात चांगल्या लोकेशनवर दुसरी जागा मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. या प्रकरणात त्याने व्यापाऱ्याकडून एकूण ८५ लाख रुपये उकळले, पण ना जागा दिली, ना पैसा परत केला.

3 / 5
फसवणूक उघडकीस आल्यानंतर जेव्हा व्यापाऱ्याने आपले पैसे आणि जागेचा तगादा लावला, तेव्हा अशोक खरातने त्याचा मानसिक छळ सुरू केला. त्याने व्यापाऱ्याला धमकी देत म्हटले, “जागेसाठी तगादा लावू नकोस, नाहीतर तुझ्यावर देवाचा कोप होईल आणि तुझे वाईट होईल.” अशा प्रकारे अनेक दिवस व्यापाऱ्याला मानसिक त्रास देत खरातने त्याला घाबरवत ठेवले होते.

4 / 5
अशोक खरातवर आतापर्यंत एकूण १२ गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी ८ गुन्हे लैंगिक शोषण आणि महिलांचा छळ यांच्याशी संबंधित आहेत, तर ४ गुन्हे आर्थिक फसवणुकीचे आहेत. सध्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात नवीन गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. खरातच्या संपर्कात आलेले आणखी किती लोक फसवणुकीचे बळी ठरले आहेत, याचा शोध घेतला जात आहे.

5 / 5
भोंदूबाबा अशोक खरातच्या गुन्हेगारी कृत्यांचा आलेख सतत वाढत चालला आहे. लैंगिक शोषणापासून आर्थिक फसवणुकीपर्यंत त्याचे कृत्य आता नाशिकसह परिसरात मोठ्या चर्चेचा विषय बनले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us