Photo : एक बैल मेला, पत्नीवरच नांगर ओढण्याची वेळ, शेतकऱ्याचे हाल पाहून डोळ्यात येईल पाणी!

Farmer Photo : राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. कधी पावसामुळे तर कधी पाण्याअभावी पीक नीट येत नाही आणि पीक जरी आलं तरी त्याला भाव मिळत नाही. अशातच आता शेतकऱ्याचे भीषण वास्तव दाखवणारी बातमी समोर आली आहे.

| Updated on: Jun 09, 2026 | 5:08 PM
1 / 5
शेतकरी मोठ्या कष्टाने शेती पिकवतो आणि समाजाला पोसण्याचे काम करतो. मात्र आता एका शेतकरी महिलेवर चक्क नांगर ओढण्याची वेळ आली आहे. आमदार रोहित पवार यांनी ही बाब समोर आणली आहे.

शेतकरी मोठ्या कष्टाने शेती पिकवतो आणि समाजाला पोसण्याचे काम करतो. मात्र आता एका शेतकरी महिलेवर चक्क नांगर ओढण्याची वेळ आली आहे. आमदार रोहित पवार यांनी ही बाब समोर आणली आहे.

2 / 5

रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, यात एक शेतकरी महिला नांगर ओढताना दिसत आहे. एक बैल मेल्यामुळे शेतकरी दांपत्यावर ही वेळ आली आहे.

3 / 5

रोहित पवार यांनी म्हटले की, लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बांबळी गावात काशिनाथ गायकवाड यांचा बैल वीज कोसळून दगावला. दुसरा बैल खरेदी करण्याची ताकद नसल्याने नांगराच्या दुसऱ्या बाजूला चक्क पत्नीला जुंपावं लागलं. ही विदारक स्थिती आहे अन्नदात्याची!

4 / 5

रोहित पवार यांनी पुढे म्हटले की, देशाचं पोट भरावं यासाठी राबणाऱ्या अन्नदात्याच्या कुटुंबाला जनावराची जागा घ्यावी लागत असेल तर हे केवळ दुखःदच नाही तर अत्यंत वेदनादायी आहे.

5 / 5

पुढे रोहित पवार यांनी, 'स्थानिक अधिकारी, लोकप्रतिनिधी, मंत्री महोदयांनी या घटनेची त्वरित दखल घेऊन या कुटुंबाला विशेष बाब म्हणून त्वरित मदत मिळवून द्यावी, अशी विनंती केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us