टोमॅटोने केले मालामाल, इतकी झाली कमाई की शेतकऱ्याने देवाला अर्पण केला चांदीचा टोमॅटो…
जेव्हा या शेतकऱ्याला या टोमॅटोच्या भरघोस पिकातून सुमारे ३० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले, तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. मग शेतकऱ्याने नवस पूर्ण झाल्याने सांवालिया सेठ मदिरात २५० ग्रॅम वजनाचा चांदीचा टोमॅटो अर्पण केला आहे.

राजस्थानच्या भीलवाडा जिल्ह्यातील मंगरोप तहसील अंतर्गत कल्याणपूर गावातील जगदीश चंद्र प्रहलाद रेबारी यांनी त्यांच्या शेतीत टोमॅटोचे पिक घेतले होते.

शेती करण्याआधी या शेतकऱ्याने भगवान सांवलिया सेठ यांच्याकडे पिक चांगले यावे आणि बाजारात चांगला दर मिळावा असे नवस केले होते.

जेव्हा टोमॅटोचे पिक पूर्ण तयार झाले आणि बाजारात विकले तेव्हा त्यांना ३० लाखाचे उत्पन्न मिळाले.

त्यामुळे आनंदी झालेल्या शेतकरी जगदीश चंद्र प्रहलाद रेबारी यांनी नवसा प्रमाणे येथील मंडपिया स्थित प्रसिद्ध सांवलिया सेठ मंदिरात केलेल्या नवसानुसार २५० ग्रॅम वजनाचा चांदीचा टोमॅटो तयार केला.

शेतकऱ्याला २० बिघा जमिनीवर पेरलेल्या पिकातून ३० लाख रुपयांचा फायदा झाला आहे. नवस पूर्ण झाल्याने जगदीश चंद्र प्रहलाद रेबारी यांनी कुटुंबासह भगवान सांवलिया सेठ मंदिरात पोहचून हा चांदीचा टोमॅटो देवाला अर्पण केला आहे.