करिअर फ्लॉप होण्याची भिती, म्हणून अभिनेत्याने सोडला बंगला, आज 84 व्या वर्षी 450 कोटींचा बनला मालक

अनेकदा काही वास्तू आपल्या प्रगतीसाठी पोषक आणि लकी ठरतात तर काही वास्तूत आपली प्रगती होत नाही. अशाच समजातून एका लोकप्रिय अभिनेत्याने विकत घेतलेला बंगला सोडला आणि आज त्याची किंमत 450 कोटी आहे.

| Updated on: Jul 27, 2026 | 11:19 PM
1 / 7
सत्तरच्या दशकातील आपल्या अनोख्या नृत्यशैलीमुळे "जम्पिंग जॅक" म्हणून ओळखले जाणारे अभिनेते जितेंद्र यांनी सहा दशकाहून अधिक मोठ्या कारकीर्दीत २०० हून अधिक चित्रपटात काम केले आहे.त्यांचा फर्ज हा चित्रपट १९६७ मध्ये रिलीज झाला होता. कारवा ( १९७१) आणि हिंमतवाला ( १९८३ ) या चित्रपटामुळे ते प्रचंड गाजले होते.

2 / 7
अभिनेते जितेंद्र यांनी एका मुलाखतीत सांगितले त्यांनी एका ज्येष्ठ अभिनेत्याचा पाली हिल येथील आलिशान बंगला  त्यांनी खरेदी केला होता. या बंगल्यामुळे करियर बुडणार अशी भिती वाटल्याने त्यांनी हा बंगला सोडून दिला. आज त्याची किंमत ४५० कोटी रुपये आहे.

3 / 7
 'द रियाल्टी ड्राईव्ह' शी बोलताना त्यांनी सांगितले की ज्येष्ठ अभिनेते भारत भूषण हे आर्थिक अडचणीत होते.त्यांना पैशाच्या कारणाने पाली हिलचा बंगला केवळ ४.२२ लाखांना विकायचा होता.

4 / 7
भारत भूषण त्या काळातील मोठी असामी होती. त्यांनी  'बैजू बावरा'सारख्या क्लासिक सिनेमातून काम केले होते. एकदा त्यांनी मला ही ऑफर दिल्याचे जितेंद्र यांनी सांगितले. त्यावेळी मी वडीलांशी बोललो आणि त्यांना सांगितले की आम्ही देखील एक बंगला विकत घेऊ इच्छीत आहे.

5 / 7
 त्यावेळी आम्ही साध्या घरात रहात होतो.  20×10 फुटाच्या घरात माझे बालपण गेले होते. येथे आठ लोक आम्ही दाटीवाटीने रहात होतो. अखेर हा बंगला आपण 4.25 लाखात विकत घेतला. विशेष म्हणजे याच किंमतीत त्यांना 3,450 चौरस फूटाचा एक प्लॉट देखील मिळाला.

6 / 7
या बंगल्यात शिफ्ट झाल्यानंतर मात्र विचित्र घटना घडू लागल्या. माझे चार चित्रपट फ्लॉप झाले. त्यामुळे मला चिंता सतावू लागली की आपण देखील भारत भूषण यांच्यासारखे आर्थिक अडचणीत तर  सापडणार नाही ना अशी भिती वाटली आणि  अखेर आम्ही हा बंगला सोडून दिला. मात्र, त्यानंतर ही प्रॉपर्टी त्यांच्यासाठी लकी सिद्ध झाली.

7 / 7
 तुम्हाला विश्वास बसणार नाही. जेव्हा या बंगल्याला पाडले, तेव्हा या बंगल्याच्या बर्मा टीकच्या लाकडातूनच आम्हाला ११.५ लाख रुपये मिळाले. आपण संपूर्ण बंगला केवळ ४.२५ लाखात विकत घेतला होता. परंतू तो पाडल्याने केवळ लाकडातूनच आम्हाला ११.५ लाख मिळाल्याचे अभिनेते जितेंद्र यांनी सांगितले. सध्याच्या किंमतीचा उल्लेख करत अभिनेते जितेंद्र म्हणाले की आज ज्या जमीनीवर ही इमारत उभी आहे. त्याचीच किंमत ४५० कोटी आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us