GK : जगातलं एकमेव मांसाहारी फळ, अनेकदा चवीनं खाल्लं जातं, नाव वाचून धक्काच बसेल!

अनेक शाकाहारी लोक उपवासाच्या दिवशी फळं खातात. परंतु हे फळ शाकाहारी नसून मांसाहारी आहे. एक छोटा कीटक या फळाला मांसाहारी बनवतो. या फळाचे नाव काय आहे असं अनेकदा विचारलं जातं.

| Updated on: Nov 26, 2026 | 10:03 PM
1 / 5
आपल्याकडे शाकाहार आणि मांसाहार यावर नेमही वाद होतो. एखादा खाद्यपदार्थ शाकाहारी आहे की मांसाहारी यावरून तो पदार्थ खायचा की नाही, हे ठरवलं जातं. शाकाहारी माणसं आवडीने फळं खातात. परंतु या जगात असं एक फळ आहे, ज्याला मांसाहारी फळ म्हटलं जातं. विशेष म्हणजे भारतातही हे फळ आवडीने खाल्लं जातं.

2 / 5

अनेक शाकाहारी लोक उपवासाच्या दिवशी फळं खातात. परंतु हे फळ शाकाहारी नसून मांसाहारी आहे. एक छोटा कीटक या फळाला मांसाहारी बनवतो. या फळाचे नाव अंजीर असे आहे. अंजीरमध्ये फायबर, कॅल्शियम, लोह असतं.

3 / 5

हे फळ खाल्लं की हाडे मजबूत होतात. आता या फलाला मांसाहारी फळ का म्हणतात ते जाणून घेऊ या. अंजारीच्या झाडावर फुलांचे परागिकरण करण्यास एक कीटक जबाबदार असतो. हा कीटक अंजिराच्या फळाला छित्र पाडून आत जातो.

4 / 5

परंतु या कीटकाला एकदा आत गेलं की बाहेर पडता येत नाही. त्यामुळे संबंधित कीटक मध्येच मरून जातो. त्या कीटकाचे अवशेष अंजीर फळातच असतात. अंजिरातील कीटकाचे काही वेळाने मध्येच विघटन होते. म्हणूनच काही लोक या फळाला मांसाहारी फळ म्हणतात.

5 / 5

(टीप- आम्ही कोणताही दावा करत नाही. या स्टोरीतील माहिती प्राथमिक स्त्रोतांवर आधारलेली आहे. कोणताही निर्णय घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us