
आसाममध्ये आलेल्या पुरात आतापर्यंत किमान 108 जणांचा मृत्यू झाला आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (ASDMA) नुसार, राज्यातील 32 जिल्ह्यांतील 54.50 लाख लोकसंख्येपैकी 30 जिल्ह्यांतील एकूण 45.34 लाख लोकसंख्या पूरग्रस्त झालीआहे .

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही आसाममध्ये आलेल्या पुरग्रस्त सिलचर शहराचे हवाई सर्वेक्षण केले आहे. तर आसाममधील पूरपरिस्थितीवर केंद्र सातत्याने लक्ष ठेवून आहे आणि आव्हानाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारसोबत काम करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

पूरग्रस्त भागात लष्कर आणि एनडीआरएफच्या पथके मदतकार्य करण्यासाठी उपस्थित आहेत. ते बचाव कार्य करत आहेत आणि पुरग्रस्त लोकांना मदतही करत आहेत. IAF ने स्थलांतर प्रक्रियेचा भाग म्हणून 250 हून अधिक उड्डाणे केली आहेत.

आसाममधील ब्रह्मपुत्रा आणि बराक नद्या त्यांच्या उपनद्यांसह बहुतेक पूरग्रस्त जिल्ह्य़ांमध्ये दुथडी भरून वाहत आहेत. कारण काही ठिकाणी कमी पाणी असूनही मोठ्या प्रमाणात जमीन पाण्याखाली गेली आहे.

हवाई पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बराक खोऱ्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला आणि तेथे अडकलेल्यांना वाचवण्यासाठी अतिरिक्त सैन्य सिलचर शहरात पाठवले जाईल, अशी घोषणा केली आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ, आर्मी आणि इतर एजन्सी बचाव कार्य करत आहेत.

पूरग्रस्त सिलचरमधील विविध ठिकाणी भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे अन्न, पाण्याच्या बाटल्या आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची 30 पाकिटे टाकण्यात आली आणि पुढील काही दिवस हे सुरूच राहणार आहे.

पूरग्रस्त भागात पिण्याचे स्वच्छ पाणी पुरवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. पाण्याच्या बाटल्या गुवाहाटी ते सिलचर येथे नेल्या जात आहेत. कारण स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा कमी आहे .