Ukdiche Modak tips : उकडीचे मोदक करताना येतं टेन्शन ? या टिप्सनी बनतील परफेक्ट मोदक, कधीच नाही फुटणार

गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर आला असून लाडक्या बाप्पाच्या आगमनसाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. गणरायासाठी सजावट, मखर यासोबतच नैवेद्याचीही तयारी करण्यात येते. गणपती बाप्पाला आवडणारे उकडीचे मोदक घरोघरी बनतातच.

| Updated on: Aug 11, 2025 | 3:01 PM
1 / 6
बहुतांश लोकांना उकडीचे मोदक आवडतात, पण प्रत्येकालाच ते अगदी परफेक्ट करता येतात असं नाही. बऱ्याच जणांचे मोदक फुटतात, मोडतात, कधी त्याची पारी नीट जमत नाही, कधी नीट कळ्या पडत नाहीत. त्यामुळे अनेकांना उकडीचेमोदक म्हटलं की टेन्शन येतं. तुमचंही तसंच होतं का ? मग काळजी करू नका. चांगले, सुंदर, पांढरेशुभ्र आणि परफेक्ट मोदक करण्यासाठी फक्त या टिप्स वाचा आणि त्याचा फॉलो करा. मग तुमचे मोदक छान  झालेच समजा.. (photos - social media)

2 / 6
मोदकाची पिठी करण्यासाठी नेहमी आंबेमोहोर आणि बासमती तांदूळ वापरावा. मोदकाची उकड गरम असते, तेव्हाच ती चांगली मळून घ्या.

3 / 6
कोमट पाण्यात हात बुडवून घ्या आणि त्याच हाताने उकड कमीत कमी 10 मिनिटं तरी मळा. मोदकाची जी पारी असते ती नाजूक आणि पातळ करा.

4 / 6
बऱ्याचदा वाफवताना मोदक फुटतात, असं होऊ नये म्हणून ते 5 सेकंद पाण्यात बुडवा आणि मग ते भांड्यात वाफवायला ठेवा.

5 / 6
मोदक वाफवताना ते केळीच्या पानावर ठेवा, म्हणजे ते चाळणीला चिकटून फुटणार नाहीत.  मोदक एकमेकांना चिकटू नयेत याची काळजी घ्या.

6 / 6
मोदक हे साधारण 12 ते 15 मिनिटे वाफवून घ्या, म्हणजे ते व्यवस्थित शिजतील. गरम असतानाच मोदक तुपाची धार सोडून नैवेद्य दाखवून खायला द्या.