ना एसी, ना कूलर… उन्हाळ्यात घर थंड ठेवण्यासाठी फॉलो करा या टिप्स

| Updated on: Apr 25, 2024 | 2:26 PM

उन्हाळ्याच्या दिवसात घर खूप तापतं, थंड वाटावं म्हणून सतत एसी, कूलरचा वापर केला जातो. त्यामुळे खोली तर गार होते पण बिल खूप वाढतं. एसी किंवा कूलरशिवायही खोली गार होऊ शकते. त्यासाठी काही टिप्स फॉलो करा.

1 / 7
बाहेरच्या कडाक्याच्या उन्हातून घरात प्रवेश केल्यावर आपण सर्वात पहिले कूलर, एसी किंवा पंखा चालू करतो. त्यामुळे गार वाटतं आणि शरीराला विश्रांती मिळते. रात्री झोपतानाही बरेच जण एसी लावतात. या सर्वांमुळे गार वाटतं पण वीजेचं बिल खूप वाढतं. अशा वेळी काही उपायांनी, जुगाड केल्यास विजेचा वापर कमी होऊ शकतो आणि गारही वाटू शकतं.

2 / 7
 तुमच्या घराच्या खिडक्यांना जाड पडदे किंवा पट्ट्या लावा जेणेकरून सूर्याची किरणे थेट घरात येणार नाहीत, त्यामुळे घर थंड राहतं आणि गरमीपासून आराम मिळतो.

3 / 7
घरामध्ये क्रॉस व्हेंटिलेशन खूप महत्वाचं आहे. त्यामुळे घरात ताजी हवा येते, आणि घर थंड राहतं. ही एक अतिशय सोपी आणि नैसर्गिक पद्धत आहे.

4 / 7
उष्णता किंवा गरमी टाळण्यासाठी घरात झाडं लावता येतात. त्यामुळे घरही थंड राहते. उष्णतेपासून आराम मिळवण्याचा हा एक नैसर्गिक मार्ग आहे. आणि हे आपल्या आरोग्यासाठीही चांगले आहे.

5 / 7
गरमी कमी करण्यासाठी आणि घर थंड ठेवण्यासाठी घरात फिक्या रंगाचे पडदे लावा. त्यानेही खूप फरक पडतो.

6 / 7
जर तुमच्या घरात Incandescent बल्ब लावले असतील तर ते बदलून त्याऐवजी CFL आणि LED बल्ब लावावेत. कारण ते खोली थंड ठेवण्यास मदत करतात.

7 / 7
आणखी एक सोपा उपायही जाणून घ्या. तो म्हणजे घरात तुमच्या टेबल फॅनसमोर एका बाऊलमध्ये बर्फाचे तुकडे ठेवा. मग पहा तुमची खोली कशी थंड होते. पण हो, ही ट्रिक मोठ्या खोल्यांसाठी नसून छोट्या खोल्यांसाठी फायदेशीर ठरेल.