
विमानतळाच्या लाऊंजमध्ये या प्रतिनिधींनी प्रवेश करताच नऊवारी परिधान केलेल्या मुली आणि धोतर ,कुर्ता व फेटा परिधान केलेल्या मुलांनी औक्षण केले. तसेच फेटा आणि सुताची माळ घालून पाहुण्यांचे स्वागत केले.

नागपूर : जी-२० परिषदेअंतर्गत होणाऱ्या सी-२० परिषदेसाठी देश-विदेशातून प्रतिनिधी आले. त्याचे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.

सदस्य देशांमधील नागरी संस्थांचे प्रतिनिधी या आगळ्यावेगळ्या स्वागताने भारावले होते. नववारी साडी परिधान करून परदेशी पाहुणीचे स्वागत करणात महिला.

स्वागतासाठी विमानतळाचा सारा परिसर सजला होता. केळीचे खांब, मोठे पितळी कळस आणि जोडीला कलावंतांनी आळवलेले बासरी, तबला आणि संवादिनीचे सूर, ठिक-ठिकाणी उभारण्यात आले होते.

सी-२० च्या अध्यक्ष माता अमृतानंदमयी, जी-२० देशांच्या नागरी संस्थांच्या प्रतिनिधींचा यात समावेश आहे. माता अमृतानंदमयी यांनीही अशी पोज दिली.