माजी क्रिक्रेटपटू झहीर खान याच्या मेहुण्याच्या लग्नात क्रिकेट आणि बॉलीवूड ताऱ्यांची उपस्थिती, नणंद सागरिकाने सर्वांचे लक्ष वेधले ; PHOTOS
माजी क्रिकेटपटू झहीर खान याच्या मेहुणा आणि अभिनेत्री सागरिका घाटगे हीचा भाऊ शिवजीत घाटगे यांच्या लग्नाचा बार उडाला आहे. या लग्नाला बॉलिवूड ते क्रिकेटर्सपर्यंत ग्लॅमर इंडस्ट्रीतून झाडून सर्व स्टार मंडळी जमली होती. क्रिकेटच्या मैदान गाजवणारे आणि आपल्या गोलंदाजीने फलंदाजांना चकीत करणारे एका लग्नसमारंभात मौजमस्ती करताना दिसले. या लग्नाचे फोटो व्हायरल झाले आहेत. काही फोटोत झहीर खान आणि सांगरिका तसेच आशीष नेहरा, अजित आगरकर आणि अन्य मंडळी दिसत आहेत. सर्वात जास्त लक्ष झहीर आणि सागरिका यांनी लक्ष वेधून घेतले.

लग्न म्हटले की सर्व दोस्त आणि नातेवाईकांचे एकत्र भेटण्याचे ठिकाणच होते. या लग्नात झहीर खान त्याची पत्नी सागरिका आणि मुलगा फतेहसिंह याच्या सोबत गप्पागोष्टी करताना दिसला. आशीष नेहरा, पार्थिव पटेल आणि अजित आगरकर हास्यविनोद करताना दिसले. या विवाह सोहळ्याचे संगीत, हळदी आणि मेहंदीपासून ते सात फेरे पर्यंतच्या सर्व झलक पाहायला मिळाल्या. या स्टारमंडळीची स्टाईल, चेहऱ्यावरील खळाखळते हास्य आणि दोस्ती तसेच यारींकडे उपस्थितांचे लक्ष जात होते.
अभिनेत्री सागरिका नणंद म्हणून भावाच्या लग्नात एकदम शाही लुकमध्ये मिरवताना दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरील आनंद लपता लपत नव्हता. तिच्या हास्यविनोदाने सर्वांचे मन जिंकले. भावाच्या संगीत कार्यक्रमात सागरिकाचा अंदाज आणि हातातील फोनमध्ये पाहातानाचा तिचे प्रेमळ हास्य पाहायला मिळतेय. कधी ती खळाळून हसताना दिसत आहे.ती प्रचंड सुंदर दिसत आहे. तिने भावाच्या संगीत साठी तिच्या लग्नाचा नऊ वर्षांपूर्वीचा लहंगा परिधान केला होता. सब्यासाची चा ऑफ व्हाईट आणि क्रिम शेडच्या एथनिक आऊटफिटमध्ये ती खूपच रॉयल वाटत होती.
अभिनेत्री सागरिका हीने नाजूक भरतकाम आणि गोटा-पट्टीच्या वर्कच्या लेहंग्यासोबत स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला होता. मोती आणि पाचूचा चोकर, त्याला जुळणारे कानातले आणि भांगेत भरलेला सिंदूर यामुळे तिचा लूक अधिकच खुलला होता.
कधी ती फोनकडे पाहात गोड हसताना दिसली, तर कधी ती अगदी मनमोकळेपणाने खळाळून हसताना दिसली. दिवसा लग्नाच्या सोहळ्यात सागरिका हीने फिकट गुलाबी आणि सिक्विनच्या वर्क असलेल्या पोशाखा दिसली. प्रत्येक फोटोमध्ये तिचा साधेपणा चेहऱ्यावरील हास्य सर्वांचे मन जिंकणारे होते.
झहीर खानने पत्नी आणि आपल्या मुलासोबत खूप मजा मस्ती केली. मेहुण्याच्या लग्नात झहीर खानदेखील खूप मौजमस्ती करताना दिसला. त्याने आपल्या मेहुण्याच्या संगीत समारंभासाठी पांढऱ्या रंगाचा बंद गळ्याचा जोधपुरी सूट घातला होता. हळदी समारंभासाठी त्याने कुर्ता-पायजमा आणि क्रीम रंगाचे नेहरू जॅकेट परिधान केले होते. झहीर खान याची क्लासिक लूक खूप आकर्षक वाटत होता.
पण या फोटोंमधील सर्वात गोड क्षण म्हणजे जेव्हा झहीर खानने आपल्या लहान मुलाला ( फतेह सिंगला) मांडीवर घेतले तो क्षण . हा छोटा नवाब सोनेरी-बदामी रंगाच्या पारंपरिक जॅकेट आणि त्याला जुळणाऱ्या बॉटम्समध्ये खूपच गोंडस दिसतोय ना... फतेह सिंगचे, कधी वडिलांच्या मांडीवर आराम करताना, तर कधी आजूबाजूच्या परिसराकडे पाहताना फोटोदेखील लक्ष वेधी आहेत. एका फोटोमध्ये, झहीर आपल्या फोनने सेल्फी घेताना आणि मित्रांसोबत हास्य विनोद करताना दिसत आहे.
यावेळी आशिष नेहरा आणि पार्थिव पटेल यांच्या धमाल-मस्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या कौटुंबिक विवाहा सोहळ्याच्या फोटोंमधून या क्रिकेटपटूंची मैत्री आणि धमाल-मस्ती दिसून येते. आशिष नेहरा, पार्थिव पटेल, अजित आगरकर आणि झहीर खान एकत्र दिसले. दिवसा झालेल्या या कार्यक्रमातील चौघांचा ग्रुप फोटो एखाद्या जुन्या क्रिकेट गँगच्या पुनर्मिलनासारखाच भासत होतो.
अजित आगरकर देखील फिकट पिवळ्या आणि आकाशी रंगाच्या कुर्त्यामध्ये दिसला. त्याने हिरव्या रंगाचा चष्मा आणि सनग्लासेस घालून आपला लूक पूर्ण केला. त्या चौघांच्या एकत्र असलेल्या फोटोंमधून त्यांची जुनी मैत्री आणि मनमोकळा स्वभाव स्पष्टपणे दिसून येतो.
आशिष नेहरा राखाडी-निळ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये, तर कधी लॅव्हेंडर रंगाच्या छटा असलेल्या कुर्त्यामध्ये दिसला. पार्थिव पटेलने संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी पांढरा भरतकाम केलेला कुर्ता आणि दिवसा चमकदार केशरी रंगाचा कुर्ता परिधान केला होता. सनग्लासेसमध्ये तो खूपच कूल दिसत होता.
संगीत, हळदी आणि मेहंदीच्या कार्यक्रमांमध्ये क्रिकेटपटू आणि कलाकारांनी खूप मजा-मस्ती केली, ज्याची झलक फोटोंमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. काही फोटोंमध्ये सागरिका घाटगे हीचे सौंदर्य आणि तिचा साधेपणा दिसत आहे, तर इतर फोटोंमध्ये झहीर आपल्या कुटुंबासोबत आणि क्रिकेटर मित्रांसोबत मजा-मस्ती करताना दिसत आहे.