माजी महिला खासदाराची का झालीये अशी अवस्था! विस्कटलेले केस, पायाला दुखापत, ओठांवर जखम… Photo पाहून व्हाल हैराण

सेलिब्रिटींचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता देखील माजी खासदार आणि अभिनेत्री मीमी मिमी चक्रवर्ती हिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे.

| Updated on: Aug 30, 2026 | 9:59 AM
1 / 5
माजी महिला खासदार आणि अभिनेत्री  मिमी चक्रवर्ती हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला देखील मोठा प्रश्न उपस्थित होईल. विस्कटलेले केस, पायाला दुखापत, ओठांवर जखम पाहून चाहते देखील चिंतेत आले आहेत.

माजी महिला खासदार आणि अभिनेत्री मिमी चक्रवर्ती हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला देखील मोठा प्रश्न उपस्थित होईल. विस्कटलेले केस, पायाला दुखापत, ओठांवर जखम पाहून चाहते देखील चिंतेत आले आहेत.

2 / 5

मिमी हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहे. एका फोटोमध्ये तिची औषधं दिसत आहेत. तर काही फोटोंमध्ये तिच्या पायाला दुखापत झाल्याचं दिसून येत आहे. शिवाय तिच्या ओठांवर देखील जखम दिसत आहे.

3 / 5

फोटो पोस्ट करत मिमीने कॅप्शनमध्ये नेमकं काय घडलं सांगितलं आहे. अभिनेत्री म्हणतेय, "एक दात पडला. एक गाल सुजलेला आहे. काही टाके पडले आहेत. ओठांवर जखम आहे. पायात पेटके आहेत.

4 / 5

पुढे अभिनेत्री म्हणते, विस्कटलेले केस. मेकअप नसलेला चेहरा. कॉफी... डॉगी. हेच सर्व पुन्हा पुन्हा. कॅमेऱ्यामागे कोणतीही ग्लॅमर टीम नाही. मी अशीच उठते असं कोणतंही नाटक नाही. फक्त एका सामान्य माणसाच्या आयुष्यातील एक खूप सामान्य आठवडा.", सध्या तिची पोस्ट सर्वत्र व्हायरल होत आहे.

5 / 5

मिमी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर मिमी हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील तिच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us