
भारत हा एक प्रमुख पेट्रोलियम शोधक आहे. येथे डिझेल, पेट्रोल, विमान इंधन सारख्यांचे निर्यात मोठ्या प्रमाणावर होते. हे साहित्य अमेरिका, संयुक्त अरब अमिराती सारख्या देशांना विकले जाते.

भारतातून अनेक बहुमोल रत्नं मिळतात. ज्याचा सर्वाधिक वापर दागिन्यात केला जातो. ही रत्न भारतातून अन्य देशात निर्यात केली जातात.

इंजिनिअरिंग उपकरणाचा विचार केला तर देशात निर्मित मशीनरी, उपकरण आणि अन्य इंजिनिअरिंग साहित्याची निर्यात परदेशात केली जाते.

बुलेट मोटर सायकलला भारतात खूप पसंद केली जाते. परंतू ही बुलेट भारताच्या बाहेर जर्मनी, इटली, युके, अर्जेंटीना, इंडोनेशिया, जपान, कोरिया, थायलंड, फ्रान्स, कोलंबिया, मॅक्सिको, ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलंडमध्ये निर्यात केली जाते.

भारतात कपड्यांचा मोठा व्यापार होतो.येथील कपडे दुसऱ्या देशात निर्यात देखील केले जातात. यात कापूस, रेशीम, अन्य प्रकारच्या कपड्यांची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते.

भारत औषधांचा एक प्रमुख उत्पादक आणि नियार्तदार आहे. यात जेनेरिक औषधे, लसी आणि अन्य औषधांचा समावेश आहे. या शिवाय कार्बनिक आणि अकार्बनिक रसायनांचाही भारत निर्यातदार आहे.

या शिवाय भारत पोलाद, इस्पात, अन्नधान्य उदा. गहू, तांदुळ, मक्का, बाजरी देखील निर्यात करतो. तसेच मांसा आधारित उत्पादने, डेअरी उप्तादनांची निर्यात भारत करतो.