जेठालाल ते बबिता.. ‘तारक मेहता..’च्या कलाकारांनी जमवली इतकी संपत्ती; कोण सर्वांत श्रीमंत?

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतील कलाकारांकडे किती संपत्ती आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? जेठालाल, बबिता, माधवी भिडे, आत्माराम भिडे यांसारख्या कलाकारांकडे नेमकी किती संपत्ती आहे, ते जाणून घ्या..

| Updated on: Apr 10, 2026 | 8:59 AM
1 / 7
'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. या मालिकेतील प्रत्येक कलाकार घराघरात पोहोचला आहे. जेठालाल, बबिता, दयाबेन, टप्पू या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय. या कलाकारांकडे एकूण किती संपत्ती आहे, ते जाणून घेऊयात..

2 / 7
'तारक मेहता..' या मालिकेला प्रचंड लोकप्रियता मिळवून देण्यात अभिनेते दिलीप जोशी यांचं मोठं योगदान आहे. यामध्ये जेठालाल गडाची भूमिका साकारून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. ते या शोमधील सर्वांत श्रीमंत अभिनेते असून त्यांच्याकडे जवळपास 47 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

3 / 7
अमित भट्ट या मालिकेत चंपकलाल गडा म्हणजेच बापूजींची भूमिका साकारतात. मालिकेच्या सुरुवातीपासून ते काम करत आहेत. आपल्या खऱ्या वयापेक्षा कितीतरी मोठ्या व्यक्तीची भूमिका साकारणारे अमित भट्ट 16.4 कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत.

4 / 7
मालिकेत बबिता आणि जेठालाल यांची केमिस्ट्री सर्वांचं लक्ष वेधून घेते. अभिनेत्री मुनमुन दत्ता यामध्ये बबिताची भूमिका साकारतेय. या मालिकेतील हा अत्यंत ग्लॅमरस आणि लोकप्रिय चेहरा आहे. मुनमुनची संपत्ती जवळपास 40 कोटी रुपये इतकी आहे.

5 / 7
माधवी भिडेची भूमिका अभिनेत्री सोनालिका जोशी साकारत आहे. या मराठमोळ्या अभिनेत्रीने हिंदी मालिकेत आपली विशेष छाप सोडली आहे. सोनालिका आणि भिडे मास्तर ही जोडी चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. सोनालिकाकडे जवळपास दहा कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं कळतंय.

6 / 7
गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आत्माराम भिडेची भूमिका अभिनेते मंदार चांदवडकर साकारत आहेत. मंदारसुद्धा या मालिकेच्या सुरुवातीपासून ही भूमिका साकारत आहेत. या भूमिकेमुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यांची एकूण संपत्ती 42 कोटींच्या आसपास आहे.

7 / 7
मालिकेत बबिताचा पती कृष्णन अय्यरची भूमिका अभिनेता तनुज महाशब्दे साकारत आहे. जेठालाल आणि अय्यर यांच्यातील थट्टामस्करी प्रेक्षकांना खूपच आवडते. तनुजकडे जवळपास 30 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

Follow Us