
Bigg Boss Regional : 'बिग ब्रदर' असो किंवा 'बिग बॉस' या सर्व शोजचा फॉरमॅट एकच आहे. गेल्या 18 सीझनपासून टीव्ही क्षेत्रात धूमाकूळ घालणाऱ्या बिग बॉसचे अनेक चाहते आहे. याच शोचा आता 19 वा सीझनही आला असून भाईजान, सलमान खान हाच यंदाचा सीझनही होस्ट करत आहे. मात्र भारतात हा शो फक्त हिंदीतच नव्हे तर इतर भाषांमध्येही होता आणि त्याला तेवढाच तूफान प्रतिसादही मिळतो. वेगवेगळ्या इंटस्ट्रीचे सुपरस्टार हे या शोचे होस्ट म्हणून आत्तापर्यंत पुढे आले आहेत. कोण-कोणत्या भाषेत प्रसारित होतो बिग बॉस, जाणून घेऊया,

1. तामिळमध्ये कमल हासन आणि विजय सेतुपती दिग्गज अभिनेते कमल हासन यांनी तमिळ भाषेमध्ये 'बिग बॉस'चे सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या कणखर व्यक्तिमत्त्वामुळे आणि कार्यक्षम होस्टिंगमुळे अल्पावधीतच त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. मात्र 7 सीझन होस्ट केल्यानंतर, त्यांनी हा शो सोडला. आता विजय सेतुपती हा, तमिळ बिग बॉस होस्ट करतो. हिंदी व्हर्जनप्रमाणेच तमिळ व्हर्जनमध्येही नाट्य, भावना आणि मनोरंजनाचा बराच तडका बघायला मिळतो.

2. तेलुगू बिग बॉसचे तीन होस्ट तेलुगूमध्ये 'बिग बॉस'चा होस्ट आहे, प्रसिद्ध अभिनेता नागार्जुन अक्किनेनी. पण या शोचा पहिला सीझन ज्युनियर एनटीआरने तर दुसरा सीझन नानीने होस्ट केला होता. मात्र तिसऱ्या सीझनपासून नागार्जुन हा बिग बॉस शो होस्ट करत आहे . प्रेक्षकांना त्याची शांत आणि संयमी होस्टिंग शैली आवडते. नागार्जुनची शैली शोला एका वेगळ्याच पातळीवर घेऊन जाते आणि तो स्पर्धकांना योग्य सल्ला देतानाही दिसतो.

3. कन्नडमध्ये किच्चा सुदीप कन्नड चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार किचा सुदीपने 'बिग बॉस'चे सूत्रसंचालन करून शोला त्याला एक नवीन ओळख दिली आहे. सुदीपचे होस्टिंग खूपच मनोरंजक असतं आणि तो स्पर्धकांशी खूप चांगले वागतो. त्याच्या लोकप्रियतेमुळे, कन्नड शो देखील खूप पाहिला जातो

4. मल्याळममध्ये मोहनलाल 'बिग बॉस'या शोच्या मल्याळम आवृत्तीत, सुपरस्टार मोहनलालने होस्टची भूमिका साकारली आहे. त्यांच्या होस्टिंगमध्ये एक खास स्टाईल दिसते. मोहनलाल त्यांच्या शांत स्वभावासाठी ओळखले जातात आणि हीच गुणवत्ता त्यांच्या होस्टिंगला इतरांपेक्षा वेगळी ठरवते. या शोचेही खूप चाहते आहेत.

5. मराठीमध्ये महेश मांजरेकर आणि रितेश देशमुख मराठी 'बिग बॉस'चे सूत्रसंचालन हे प्रसिद्ध बॉलिवूड आणि मराठी चित्रपट अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी केले होते. मांजरेकरांची स्पष्टवक्ती शैली आणि खरं बोलण्याची सवय यामुळे त्यांचे सूत्रसंचालन खास बनले. मात्र मांजरेकर यांच्यानंतर आता रितेश देशमुख हा या शोचा होस्च बनला असून त्याची स्टाईलही, होस्टिंग अनेकांना आवडतं. या शोचा होस्ट म्हणून प्रवेश करत रितेश देशमुखने टीआरपीचे अनेक रेकॉर्ड मोडले.

6. बंगालीमध्ये मिथुन चक्रवर्ती आणि जीत 'बिग बॉस'ची बंगाली आवृत्ती आतापर्यंत अनेक मोठ्या स्टार्सनी होस्ट केली आहे, त्यामध्ये मिथुन चक्रवर्ती, जीत आणि सौरव गांगुली यांचा समावेश आहे. मिथुन दा यांनी त्यांच्या खास शैलीने शो लोकप्रिय केला, तर जीत यांनी त्यांच्या होस्टिंगने प्रेक्षकांना प्रभावित केले.