मृत व्यक्तीचे दागिने-कपडे वापरणे चांगले की वाईट? गरुड पुराण काय सांगते?

Garud Puran : अनेक वेळा लोक आपल्या कुटुंबातील व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांचे कपडे आणि दागिने वापरतात. मात्र हे दागिने वापरणे चांगले की वाईट हे जाणून घेऊयात.

बापू गायकवाड | Updated on: Mar 30, 2026 | 7:33 PM
1 / 5
मृत व्यक्तीचे दागिने आणि कपडे वापरू की नयेत याबाबत गरुड पुराणात सविस्तर माहिती दिली आहे. यामुळे काय होते याबाबत सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणारआहोत.

मृत व्यक्तीचे दागिने आणि कपडे वापरू की नयेत याबाबत गरुड पुराणात सविस्तर माहिती दिली आहे. यामुळे काय होते याबाबत सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणारआहोत.

2 / 5

गरुड पुराणानुसार, मृत व्यक्तीचे दागिने कधीही धारण करू नयेत. ते तुम्ही आठवण म्हणून घरात ठेवू शकता, पण त्यांचा वापर करणे चुकीचे मानले जाते. पण मृत व्यक्तीने जिवंत असताना तुम्हाला एखादा दागिना भेट म्हणून दिला असेल, तर तो तुम्ही वापरू शकता.

3 / 5

मृत व्यक्तीचे कपडे घालणे देखील गरुड पुराणानुसार योग्य मानले जात नाही. मृत व्यक्तीच्या जवळच्या नातलगांनी असे करू नये. असे केल्यास त्या व्यक्तीचा आत्मा तुमच्याकडे आकर्षित होऊ शकते आणि त्याला मोहाच्या बंधनातून मुक्त होण्यास अडचण येऊ शकते. असे केल्याने पितृदोष होण्याची शक्यताही निर्माण होते.

4 / 5

मृत व्यक्तीचा पलंगही वापरणे टाळावे. त्या जागी नवीन पलंग ठेवावा. असे केल्याने मृत व्यक्तीच्या आत्म्याला लवकर मुक्ती मिळते आणि तिला शांती प्राप्त होते.

5 / 5

मृत व्यक्तीचे कपडे ज्यांचा तुमच्या पितरांशी कोणताही संबंध नाही अशा गरजू लोकांना दान करावेत. जर तुम्हाला आपल्या पितरांना मृत्यूनंतर मोक्ष मिळावा आणि त्यांच्या आत्म्याला मुक्ती मिळावी असे वाटत असेल, तर घरात गरुड पुराणाचे पठण करणे योग्य मानले जाते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us