Buddha Purnima 2026 : गौतम बुद्ध यांचा विवाह ते ज्ञानप्राप्ती, वाचा त्यांच्या आयुष्यातील कुणालाही माहिती नसलेल्या गोष्टी!
येत्या 1 मे रोजी संपूर्ण भारतात तसेच जगभरात बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. शांतता, अहिंसा, सत्याचा मार्ग सांगणाऱ्या गौतम बुद्ध यांच्याविषयीच्या काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेऊ या....

येत्या 1 मे रोजी संपूर्ण भारतात तसेच जगभरात बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. शांतता, अहिंसा, सत्याचा मार्ग सांगणाऱ्या गौतम बुद्ध यांच्याविषयीच्या काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेऊ या....

महात्मा गौतम बुद्ध यांचे लहानपणीचे नाव सिद्धार्थ असे होते. त्यांच्या वडिलांचे नमाव शुद्धोधन होते. ते कपिलवस्तूचे राजा होते. त्यांच्या आईचे नाव महामाया असे होते. गौतम बुद्ध यांच्या जन्मानंतर सातव्याच दिवशी महामाया यांचे निधन झाले.

सिद्धार्थ लहानपणापासूनच शांतता प्रिय होते. त्यांचा राजकुमारी यशोधरा यांच्याशी वयाच्या 16 व्या वर्षी विवाह झाला. विवाहानंतर सुद्धार्थ आणि यशोधरा यांना राहुल नावाचा एक मुलगा झाला.

गौतम बुद्ध यांनी सत्याचा शोध घेण्यासाठी घराचा, संसाराचा त्याग केला होता. बिहारमधील गया येथे एका वटवृक्षाखाली त्यांना ज्ञानप्राप्ती झाली होती. ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्यांना संबोधी म्हटे जाऊ लागले.

ज्ञानप्राप्तीनंतर गौतम बुद्ध यांनी सर्वप्रथम सारनाथ येथे आपल्या पाच शिष्यांना उपदेस केला. महात्मा गौतम बुद्ध यांनीच बौद्ध धर्माची स्थापना केली. महात्मा गौतम बुद्ध यांच्या विचारांचा सर्वाधिक प्रचार-प्रसार सम्राट अशोक यांनी केलेला आहे.