गौतमी पाटीलचा आतापर्यंतचा सर्वात सुंदर लूक, फोटो पाहूनच चाहते करत आहेत कौतुक

कपाळी चंद्रकोर, नाकात नथ अन् निळ्या रंगाच्या साडीत गौतमी पाटीलचा समुद्रकिनारी पारंपारिक लूक. हटके स्टाईलची होतेय प्रचंड चर्चा.

| Updated on: May 19, 2026 | 3:17 PM
1 / 6
मराठी मनोरंजनविश्वात सध्या गौतमी पाटील हिची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. आपल्या नृत्यशैली, हटके अंदाज आणि वेगवेगळ्या लुकमुळे कायम चर्चेत राहणारी गौतमी पुन्हा एकदा चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

2 / 6
तिचं नवीन गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून, त्यातील तिचा पारंपरिक आणि मॉडर्न लुक चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. ती नेहमीच आपल्या वेगळ्या स्टाइलसाठी ओळखली जाते. कधी पारंपरिक नऊवारी साडीत तर कधी वेस्टर्न आणि मॉडर्न आउटफिटमध्ये ती आत्मविश्वासाने वावरताना दिसते.

3 / 6
यावेळीही तिने पारंपरिक मराठमोळ्या लुकला आधुनिक फॅशनची जोड देत एक वेगळाच ट्रेंड सेट केला आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘तू मोरनी’ या गाण्यात गौतमीचा हटके अंदाज पाहायला मिळत आहे. या गाण्याला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असून सोशल मीडियावरही त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

4 / 6
गाण्यातील तिचा लुक विशेष आकर्षण ठरत आहे. मोरपंखी रंगाची नऊवारी साडी, पायात पांढरे शूज, डोळ्यांवर स्टायलिश गॉगल आणि नाकात पारंपरिक नथ असा लुक करत गौतमीने चाहत्यांना अक्षरशः भुरळ घातली आहे.

5 / 6

6 / 6
या गाण्याची आणखी एक खास गोष्ट म्हणजे यात काही आज्याही गौतमीसोबत झळकत आहेत. पारंपरिक नऊवारी आणि सहावारी साड्यांमध्ये दिसणाऱ्या या आज्यांनी देखील डोळ्यांवर गॉगल लावत मॉडर्न टच दिला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us