पवार गटात मोठी उलथापालथ? रोहित पवार देणार जबर धक्का? काँग्रेसमध्ये…भाजपा नेत्याच्या दाव्याने मोठी खळबळ!
दुसरीकडे काँग्रेसलाही कोणीतरी हवं आहे. आपण पुढे राहायचं, काँग्रेसचा माजून पाठिंबा घ्यायचा, असं रोहित पवार प्रसिद्धीसाठी करत आहेत. नेतृत्त्वाच्या हव्यासापोटी त्यांचं हे चालू आहे, असा आरोप दरेकर यांनी केला.

Rohit Pawar : आमदार रोहित पवार रोहित पवार शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढणार आहेत. रोहित पवार यांचा हा आगामी मोर्चा सध्या चांगलाच चर्चेत आहे. या मोर्चाला त्यांच्या राष्ट्रवादी (पवार गट) पक्षाचा पाठिंबा नाही, असा दावा केला जातोय. या सर्व तर्कवितर्कावर आता रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलंय. काही ठिकाणी आम्ही पक्षाचं चिन्ह वापरलं तर काही ठिकाणी वापरलं नाही, असं स्पष्टीकरण रोहित पवारांनी दिलंय. त्यांच्या या मोर्चाला मात्र काँग्रेसने जाहीर पाठिंबा दिलाय. दरम्यान, याच मोर्चाच्या अनुशंगाने बोलताना भाजपाचे नेते प्रविण दरेकर यांनी मोठा आणि खळबळजनक दावा केला. त्याच्या या दाव्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा उलटफेर घडून येणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय.
ते सुप्रिया सुळे यांचंही नेतृत्त्व मानायला तयार नाहीत
भाजपाचे नेते प्रविण दरेकर यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचित केली. यावेळी बोलताना त्यांनी रोहित पवार यांचा मोर्चा आणि त्यांच्या पक्षाची भूमिका यावर भाष्य केलं. “रोहित पवार यांचा वारू बेफाम सुटलेला आहे. ते शरद पवार यांचं नेतृत्त्व मानायला तयार नाहीत. ते सुप्रिया सुळे यांचंही नेतृत्त्व मानायला तयार नाहीत. रोहित पवार यांना नेतृत्त्वाची घाई लागली आहे. त्यांना शरद पवार व्हायची घाई लागली आहे,” अशी बोचरी टीका दरेकर यांनी केलीय.
रोहित पवार काँग्रेसमध्ये जाणार
तसेच, दुसरीकडे काँग्रेसलाही कोणीतरी हवं आहे. आपण पुढे राहायचं, काँग्रेसचा माजून पाठिंबा घ्यायचा, असं रोहित पवार प्रसिद्धीसाठी करत आहेत. नेतृत्त्वाच्या हव्यासापोटी त्यांचं हे चालू आहे, असा आरोप दरेकर यांनी केला. पुढे बोलताना, रोहित पवार आज ना उद्या काँग्रेसमध्ये जाणारच असा खळबळजनक दावाही दरेकर यांनी केलाय. दरम्यान, त्यांच्या या दाव्यानंतर आता राजकीय वर्तुळात नवी खळबळ उडाली आहे. एकीकर शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आगामी कालात एनडीएत सहभागी होऊ शकतो, असा दावा केला जातोय. असे असताना रोहित पवार मात्र सातत्याने भाजपा आणि महायुतीच्या विरोधात बोलताना दिसत आहेत. त्यामुळे आगामी काळात नेमकं काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
