GK : या देशात कुत्र्यांवर बंदी,पकडले गेल्यास होतो मोठा दंड

Ban On Dogs: जगात डॉग लव्हरची कमी नाही. अनेक देशात कुत्रा हा अंध आणि अपंगांना मदत म्हणूनही ज्येष्ठ नागरिकांकडून पाळला जातो. मात्र जगात एक असाही देश आहे, जेथे कुत्रे पाळण्यावर बंदी घालण्यात आलेली आहेय चला तर पाहूयात कोणता हा देश आहे.

| Updated on: Dec 24, 2025 | 12:23 AM
1 / 7
कुत्रा मानवाचा नेहमीच मित्र मानला जातो, परंतू एक देश असा आहे जेथे कुत्रे पाळण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. जर येथे या नियमाचे उल्लंघन केले तर मोठा दंड आणि कायदेशीर कारवाई होऊ शकते. चला तर पाहूयात कोणता हा देश आहे.

2 / 7
मालदीव बेटावर कुत्रे आणणे किंवा पाळण्यावर संपूर्णपणे बंदी आहे. हा नियम सर्व नागरिकांसह, परदेशी पाहुणे आणि पर्यटकांना समान रुपाने लागू आहे.

3 / 7
अलिकडेच मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुईजू यांनी पशु कल्याण अधिनियमाला मंजूरी दिली आहे. येथे कुत्र्यांसह प्रतिबंधित जनावरासंबंधित दंड खूप कठोर केलेला आहे. कस्टम, बंदरे आणि बेटावर या नियमांची अंमलबजावणी सक्तीने केली जाते.

4 / 7
नवीन कायद्यानुसार कुत्र्यांसारख्या प्राण्यांची आयात वा निर्यात करण्याचा प्रयत्न केल्यानंतर सुमारे ३२३ डॉलर ते ३२,४२५ डॉलरचा दंड होऊ शकतो. या नियमांचे वारंवार उल्लंघन केल्यास दंडा व्यतिरिक्त कायदेशीर कारवाई होते.

5 / 7
 मालदीवमध्ये कायद्याने केवळ पोलिस, वा सीमाशुल्क दलाला कुत्रे पाळण्याचा अधिकार आहे. या स्निफर डॉगना ड्रग्स शोधण्यासाठी, सुरक्षा मोहिमा आणि कायदेशीर कारवाईच्या कामासाठी वापरले जाते.

6 / 7
 पर्यटकांना कोणत्याही परिस्थितीत मालदीवमध्ये कुत्रे आणण्याची परवानगी दिलेली नाही. जर पर्यटकाने चुकून किंवा अनपेक्षितपणे कुत्रा आणला तर कस्टम अधिकारी तो ताबडतोब जप्त करतात. त्या प्राण्याला एकतर त्याच्या मूळ देशात परत पाठवले जाते किंवा पर्यटक निघेपर्यंत कस्टम बॉन्ड सुविधेत ठेवले जाते.

7 / 7
पाळीव कुत्र्यांवरील ही बंदी धार्मिक मान्यता आणि स्वच्छतेच्या नियमांवर आधारित आहे.विशेष म्हणजे, येथे मांजरी पाळण्यास पूर्णपणे परवानगी आहे.