GK: मुलं जन्माला आल्यावर रडतच का? हसत का नाही?

baby Crying: मुलं जन्माला येणं हा एक आनंदाचा क्षण असतो.आई-बाबांसाठीच नाही तर आजी-आजोबा, मामा-मामीसह भावंड आणि नातेवाईकांसाठी एक भावनिक क्षण असतो. पण मुलं जन्माला येतं तेव्हा ते का रडतं? ते जन्मानंतर हसत का नाही?

| Updated on: Feb 22, 2026 | 4:15 PM
1 / 6
मुलं जेव्हा आईच्या गर्भातून बाहेर येतं, तेव्हा ते नवीन जगात पाऊल ठेवतं. गर्भाच्या आतील तापमान स्थिर असतं. थोडासा प्रकाश आणि आवाजही कमी असतो. पण बाहेर येताच प्रखर प्रकाश, बाहेरील थंड-उष्ण वातावरण आणि गोंगाट असतो. कानावर विविध आवाज आदळतात.

2 / 6
या अचानक बदलाला लहान मुलाचं शरीर लागलीच प्रतिक्रिया देतं. ही प्रतिक्रिया रडण्यातून समोर येते. हे लहान मुलाच्या जिवंतपणाचं एक लक्षणं ही असतं. त्याचं शरीर हे नव्या वातावरणाशी समतोल साधण्याचे रडणे हा एक संकेत असतो.

3 / 6
डॉक्टरांनुसार, लहान मुलांचं पहिलं रडणं हे त्याचं आरोग्य चांगलं असल्याचा पहिला संकेत मानल्या जातो. गर्भात लहान मुलाची फुफ्फुस पूर्णपणे विकसीत वा सक्रिय नसतात. कारण त्याला नाळेद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येतो.

4 / 6
लहान मुलं आईच्या पोटातून बाहेर येताच स्वतः श्वास घेतात. या काळात मुलं हे जोरानं श्वास आत घेतं आणि बाहेर सोडतं. त्यावेळी त्याची फुफ्फुसं रुंदावतात. त्यातील तरळ पदार्थ बाहेर येतो. ही प्रक्रिया त्याला स्वतंत्रपणे श्वास घेण्यास सक्षम करते.

5 / 6
पहिले रडणे हा केवळ आवाज नाही. तर संपूर्ण शरिरासाठीचा बदल आहे. या रडण्यामुळे त्याच्या हृदयाची गती वाढते. ठोके आणि नाडी सुरळीत सुरू होते. रक्तसंचार सुरू होतो. एकाचवेळी बदलाची प्रक्रिया सुरू होते. ऑक्सिजन संपूर्ण शरीरात पोहचला जातो.

6 / 6
त्यामुळे अनेकदा जन्म झाल्यानंतर मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकण्यासाठी डॉक्टर थोडावेळ थांबतात. कारण मुलं रडलं म्हणजे त्याचं फुफ्फुस आणि हृदय योगरित्या काम करत असल्याचे हे प्रतिक आहे. पण मुलं जन्माला आल्यानंतर का हसत नाही हा प्रश्न उरतोच? तर हसणे ही एक भावनात्मक आणि सामाजिक प्रतिक्रिया असते, ती मेंदूच्या विकासाशी जोडलेली असते. काही दिवसांनी ही भावना पण चेहऱ्यावर झळकू लागते.