GK : पाकिस्तानच्या सैन्यात किती महिला आहेत? आकडा वाचून बसेल धक्का

Women in Pakistan Army : पाकिस्तानमध्ये महिलांना दुय्यम स्थान आहे, सार्वजनिक ठिकाणीही महिलांची उपस्थिती मर्यादित असते. आज आपण पाकिस्तानच्या सैन्यात किती महिला आहेत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Dec 24, 2025 | 9:03 PM
1 / 5
सध्या पाकिस्तानी सैन्यात 5000 पेक्षा जास्त महिला कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांत सैन्याच्या विविध शाखांमध्ये सुमारे 700 महिलांना अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

2 / 5
पाकिस्तानी सैन्यातील एकूण क्षेत्रांपैकी 80% क्षेत्रे आता महिलांसाठी खुली करण्यात आली आहेत.यात मेडिकल कोअर (AMC), आयटी (IT), सिग्नल्स, शिक्षण, पुरवठा (Supply) आणि प्रशासन या विभागांचा समावेश आहे.

3 / 5
निगार जोहर या पाकिस्तानी सैन्यातील पहिल्या महिला 'लेफ्टनंट जनरल' (थ्री-स्टार जनरल) ठरल्या आहेत. त्यांनी 'सर्जन जनरल' म्हणूनही काम पाहिले आहे.

4 / 5
महिलांना अजूनही इन्फंट्री (Infantry), आर्टिलरी (Artillery) आणि आर्मर्ड युनिट्स यांसारख्या थेट लढाऊ तुकड्यांमध्ये प्रवेश दिला जात नाही. मात्र 2013 मध्ये पाकिस्तान सैन्यातील 24 महिला अधिकाऱ्यांच्या पहिल्या तुकडीने पॅराट्रूपरचा (विमानाने उडी मारण्याचे प्रशिक्षण) कोर्स यशस्वीपणे पूर्ण केला होता.

5 / 5
पाकिस्तानच्या निर्मितीपासूनच महिला सैन्याचा भाग आहेत. बेगम राना लियाकत अली खान यांनी 1940 च्या दशकात 'वुमेन्स नॅशनल गार्ड'ची स्थापना करून यासाठी पुढाकार घेतला होता.