GK : भारतातील सर्वात अनोखी नदी, 2900 किमी वाहते पण प्रत्येक राज्यात वेगळे नाव
India Most Unique River : भारतात 400 हून अधिक लहान-मोठ्या नद्या आहेत. गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा, महानदी, नर्मदा, कावेरी आणि तापी यांसारख्या अनेक प्रमुख नद्यांचा यात समावेश होतो. मात्र, तुम्हाला माहिती आहे का, अशी एक नदी आहे जी तीन वेगवेगळ्या प्रदेशांत तीन वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते? तिची माहिती आज आपण जाणून घेऊयात.

आपण ब्रह्मपुत्रा नदीची माहिती जाणून घेत आहोत. सुमारे 2,900 किलोमीटर लांबीची ही नदी आशियातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या नद्यांपैकी एक मानली जाते.

ब्रह्मपुत्रा ही केवळ एक नदी नसून भारत, तिबेट आणि बांग्लादेश या प्रदेशांतील संस्कृती, सभ्यता, शेती आणि अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहे.

या नदीला प्रवाहाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळी नावे आहेत. अरुणाचल प्रदेशात ही नदी सियांग किंवा दिहांग या नावाने ओळखली जाते. आसाममध्ये हीच नदी ब्रह्मपुत्रा म्हणून प्रसिद्ध आहे. बांगलादेशात प्रवेश केल्यानंतर तिला जमुना असे म्हटले जाते.

ब्रह्मपुत्रा नदीचा उगम तिबेटमधील कैलास पर्वताजवळील अंगसी हिमनदातून झाल्याचे मानले जाते. तेथून ही नदी पूर्वेकडे लांबचा प्रवास करते.

हिमालय पर्वतरांगांना छेद देत ही नदी भारतात अरुणाचल प्रदेशात प्रवेश करते, जिथे तिला सियांग किंवा दिहांग या नावांनी ओळखले जाते. त्यानंतर ती आसाममध्ये प्रवेश करून ब्रह्मपुत्रा नावाने पुढे वाहते आणि अखेरीस बांगलादेशात जमुना म्हणून प्रवास सुरू ठेवते.