AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

China City Submerged : दक्षिण चीनच्या गुआंग्शी झुआंग प्रदेशातील निंगमिंग शहर भीषण पुरामुळे पाण्याखाली गेले आहे. येथील विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नेपाळमध्ये प्रलय... दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच
china ningming city submergedImage Credit source: X
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 26, 2026 | 11:31 PM
Share

नेपाळमध्ये आलेल्या महापुरामुळे हजारो लोकांचे जनजीवन विस्कळित झाले आहे. पुराच्या पाण्यात अनेक लोक बेपत्ता झाले आहेत. यात भारतातील 100 पेक्षा जास्त पर्यटकांचा समावेश आहे. नेपाळमधील महापुराचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना आता चीनमधून मोठी बातमी समोर आली आहे. दक्षिण चीनच्या गुआंग्शी झुआंग प्रदेशातील निंगमिंग शहर भीषण पुरामुळे पाण्याखाली गेले आहे. येथील विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

शहराचा संपर्क तुटला

मुसळधार पावसामुळे निंगमिंगमधील प्रमुख जलमार्ग असलेल्या मिंगजियांग नदीला मोठा पूर आला आणि नदीचे पाणी सखल भागांमध्ये शिरले. यामुळे अनेक रस्ते, शेती आणि नदीकाठचा परिसर आता मोठ्या प्रमाणात पाण्याखाली गेला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, शहरातील रस्ते पाण्याखाली गेले असून काही भागांचा संपर्क तुटला आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपत्कालीन पथके प्रयत्न करत आहेत.

पाणी पातळीत विक्रमी वाढ

निंगमिंगमध्ये पाण्याची पातळी सर्वोच्च पातळीवर पोहोचली. ती धोक्याच्या इशारा पातळीपेक्षा तब्बल 7.69 मीटरने अधिक झाली असून, यापूर्वीचा ऐतिहासिक विक्रमही 1.07 मीटरने मोडला आहे. यामुळे अनेक रहिवासी भाग पाण्याखाली गेले आहेत. एक कारखानाही पाण्याखाली गेला आहे. या ठिकाणी 30 हून अधिक लोक अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. यातील एका कामगाराने सांगितले की मी यापूर्वी इतका भीषण पूर कधीही पाहिलेला नाही.

या पुराबाबत बोलताना आणखी एक कर्मचारी झेंग हेंग यांनी सांगितले की, ‘गेल्या दशकातील निंगमिंगमधील हा सर्वात भीषण पूर आहे. पाण्याची पातळी इतक्या वेगाने आणि इतकी वाढेल, अशी मला अपेक्षा नव्हती. मला खूप चिंता वाटत होती. संपर्क व्यवस्था बंद असल्यामुळे कुटुंबीयांचीही काळजी वाटत होती. आज सकाळी सुमारे 8 वाजता आम्हाला बचाव नौका एक-दोन तासांत पोहोचतील, अशी माहिती मिळाली. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला. आता आम्ही सुरक्षितपणे बाहेर आलो आहोत आणि मला सुरक्षित वाटत आहे.’

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ