
भारतात अनेक अशी शहरे आहेत, जी प्राचीन काळापासून वसलेली आहेत. आज आपण भारतातील एका अशा शहराची माहिती जाणून घेणार आहोत, ज्याचे नाव एक-दोन वेळा नव्हे तर तब्बल 21 वेळा बदलण्यात आले आहे.

21 वेळा नाव बदललेले शहर म्हणजे उत्तर प्रदेशातील कानपूर. याचे नाव भूतकाळात सुमारे 21 वेळा बदलले आहे. हे शहर त्याच्या संस्कृती, शैली आणि पाककृतीसाठी प्रसिद्ध आहे.

कानपूरचे मूळ नाव कान्हापूर होते. त्याची स्थापना हिंदू सिंह चंदेल यांनी केली होती. त्यानंतर या शहराचे नाव वेळोवेळी बदलले आहे. मुघलांपासून ब्रिटिशांपर्यंत सर्वांनी त्याच्या नावात बदल केलेला आहे.

ब्रिटिश राजवटीत कानपूर हे सत्तेचे एक प्रमुख केंद्र होते. कानपूरचे नाव शेवटचे 1948 मध्ये बदलण्यात आले असे म्हटले जाते. मात्र त्यानंतर या शहराचे नाव बदललेले नाही.

ब्रिटिश राजवटीत या शहराल कॉनपूर असे म्हटले जात होते, मात्र स्वातंत्र्यानंतर या शहराचे नाव कानपूर असे करण्यात आले आहे. त्या काळात ते एक मजबूत औद्योगिक केंद्र म्हणून विकसित झाले होते.