
सर हा शब्द कुठून आला? : सर हा फ्रेंच आहे. हा शब्द सुरुवातीला राजे किंवा उच्च अधिकाऱ्यांना सूचित करण्यासाठी वापरला जात असे. नंतर हा शब्द सामान्यपणे वापरला जाऊ लागला.

सर शब्द का वापरला जायचा? : प्राचीन काळात सर हा शब्द फक्त राजे किंवा उच्च पदांवर असलेल्या लोकांसाठी वापरला जायचा. मात्र सध्या वडीलधारी आणि वरच्या पदावर असलेल्या लोकांना सर म्हटले जाते.

मॅडम हा शब्द कुठून आला? : मॅडम हा फ्रेंच शब्द आहे. फ्रान्समध्ये उच्चवर्गीय महिलांसाठी हा शब्द वापरला जायचा. महिलेप्रती आदर व्यक्त करण्यासाठी हा शब्द वापरला जात असे.

मॅडम शब्द भारतात कधी आला? भारतात हा शब्द जास्त प्रचलित नव्हता, मात्र इंग्रजांच्या आगमनानंतर या शब्दाचा ट्रेंड सुरू झाला. आता हा शब्द उच्च पदावरील महिलांसाठी वापरला जातो.

भारतातील लोक कोणते शब्द वापरायचे? : भारतात या शब्दांऐवजी आदरणीय किंवा जी असे शब्द वापरते जात असायचे. मात्र इंग्रज आल्यानंतर सर आणि मॅडम हे शब्द लोकप्रिय झाले.