GK : नखं आणि केस कापताना वेदना का होत नाहीत? जाणून घ्या उत्तर
Hair and Nail : आपल्या केसांची आणि नखांची वाढ सतत होत असते. त्यामुळे वेळोवेळी ते कापावे लागतात. मात्र नखं आणि केस कापताना वेदना का होत नाहीत? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मृत पेशी (Dead Cells): नखे आणि केस हे मृत पेशींपासून बनलेले असतात, त्यामुळे त्यांना कापताना आपल्याला वेदना जाणवत नाहीत.

केराटिन प्रोटीन: नखे आणि केस ज्या पेशींनी बनलेले असतात, त्यात 'केराटिन' (Keratin) नावाचे प्रथिन असते. हे प्रथिन पूर्णपणे निर्जीव असते, त्यामुळे ते कापताना कोणतीही संवेदना निर्माण होत नाही.

त्वचेला लागून असलेले भाग: त्वचेच्या अगदी जवळ असलेल्या नखांच्या किंवा केसांच्या मुळाशी जिवंत पेशी असतात. त्यामुळे त्वचेला लागून असलेला भाग कापल्यास वेदना होतात.

केराटिनचे महत्त्व: केराटिन शरीरासाठी महत्त्वाचे असते. शरीरात या प्रथिनांची कमतरता असल्यास केस गळणे, कोरडे होणे किंवा केस पांढरे होणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

नखांची कमजोरी: जेव्हा शरीरात केराटिनची कमतरता असते, तेव्हा त्याचा परिणाम नखांवरही होतो. यामुळे नखे कमकुवत होतात आणि थोड्याशा कामामुळे ती तुटू लागतात.