Gold Rate : एका रात्रीत अजब घडलं, सोन्याचा भाव एवढा वाढला की…नवा रेट पाहून अचंबित व्हाल!

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठे चढउतार होताना पाहायला मिळत आहे. असे असतानाच आज तर चांदीचा भाव थेट दोन लाखांच्या पुढे गेला आहे. सोन्याच्या भावानेही मोठी झेप घेतली आहे.

| Updated on: Dec 11, 2025 | 7:25 PM
1 / 5
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात आश्चर्यकारकरित्या बदल होत आहे. कधी सोन्याचा भाव धाडकन कमी होतोय. तर कधी या धातूचा भाव क्षणात रॉकेटच्या वेगाने वर जातोय. सध्या तर सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंचा भाव आश्चर्यकारकरित्या वाढला आहे.

2 / 5
देशांतर्गत सराफा बाजारात मोठी घडामोड घडली आहे. चांदीचा भाव थेट दोन लाख प्रति किलोच्याही पुढे गेला आहे. तर दुसरीकडे सोन्याचाही भाव चांगलाच वाढला आहे. 11 डिसेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,30,470 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे.

3 / 5
मिळालेल्या माहितीनुसार 11 डिसेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव दिल्लीमध्ये 1,30,470 रुपये प्रती 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. मुंबईत हाच सोन्याचा भाव 1,30,320  रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. चांदीच्या भावाने तर मोठा विक्रमच केला आहे. चांदीचा भाव थेट दोन लाखांच्या पुढे गेला आहे.

4 / 5
बुधवारी (10 डिसेंबर) अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदरात मोठी कपात केली. फेडरल रिझर्व्ह व्याजदराबाबत नेमका काय निर्णय घेणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. असे असतानाच या बँकेने व्याजदरात कपात केली आहे. त्यामुळे भारतात सराफा बाजारात मोठा बदल झालेला पाहायला मिळाला. सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली.

5 / 5
दरम्यान, फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात केल्याने सध्या दोन्ही मौल्यवान धातू महागले आहेत. असे असताना महागाई आणि जागतिक अनिश्चितता कायम राहिली तर भविष्यात हा भाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.