
गुडरिर्टन्सनुसार, सोन्याच्या दरात ८२० रुपयांची वाढ झाली आहे. आता २४ कॅरेट सोन्याचा दर ९८,५५० रुपये आणि २२ कॅरेट सोन्याचा भाव ९०,३५० रुपये इतकी आहे

सध्या वेगवेगळ्या वैश्विक कारणांमुळे सोन्याचा भाव कमी झालेला दिसतोय. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह या बँकेकडून व्याजदरात कपात केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच सोन्याची मागणी सध्या काहीशी कमी झाली आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात 12 मे 2025 रोजी शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतर दोन्ही देशांतील तणाव कमी झाला आहे. त्यामुळेच सोन्यासारख्या खात्रीलायक गुंतवणुकीत पैसे गुंतवण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळेच मागणीत सध्या घट झाली आहे.

सध्या अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारविषयक तणाव कमी झाला आहे. यामुळे वैश्विक पातळीवरील व्यापारातही तणाव कमी झाल आहे. त्यामुळेच जोखीम असणाऱ्या क्षेत्रात गुंतवणूकदार करत आहेत. त्यामुळे सोन्याचा भाव सध्या घसरला आहे.

रशिया-युक्रेन यांच्या गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेल्या युद्धामुळे सोने-चांदीच्या दरात वाढ व घट होत आहे, असल्याचं सराफ व्यवसायिकांचं म्हणणं आहे

दुसरीकडे सोन्याच्या दरात ७०० रुपयांची घसरण होऊन सोन्याचे दर जीएसटीसह १ लाख ४२५ रुपयांवर खाली आले आहेत. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे

गेल्या 15 दिवसांपूर्वी जीएसटीसह सोन्याचे दर हे 95 हजार रुपये एवढे होते, पंधरा दिवसात सोन्याच्या दरात चार हजार 900 रुपयांची वाढ झाली आहे.