Gold Rate : सोनं धाडकन 25000 रुपयांनी आपटलं, भाव चांगलाच गडगडला, आता 10 ग्रॅमसाठी फक्त…

गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याचा भाव कधी वाढता तर कधी कमी होताना दिसतो आहे. आज पुन्हा एकदा सोनं धाडकन कोसळलं आहे. हा नवा भाव पाहून सामान्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

| Updated on: Feb 17, 2026 | 9:33 PM
1 / 5
सोन्याच्या भावात 17 जानेवारी रोजी घसरण पाहायला मिळाली. दुपारी 12 वाजता सोन्याच भाव 2903 रुपयांनी कमी झाला होता. या घसरणीसह नवा भाव 151195 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपये झाला होता. सोन्याची ही घसरण पाहून सामान्यांनी दिलासा व्यक्त केला.

सोन्याच्या भावात 17 जानेवारी रोजी घसरण पाहायला मिळाली. दुपारी 12 वाजता सोन्याच भाव 2903 रुपयांनी कमी झाला होता. या घसरणीसह नवा भाव 151195 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपये झाला होता. सोन्याची ही घसरण पाहून सामान्यांनी दिलासा व्यक्त केला.

2 / 5

आकड्यांमध्ये बोलायचे झाल्यास सोन्याची ही घसरण आपल्या सार्वकालिक उच्चांकाच्या तुलनेत खूपच जास्त आहे. सोनं कधीकाळी 176121 रुपये प्रति 10 ग्रॅम या रेकॉर्डब्रेक किमतीपर्यंत वाढलं होतं. या भावाच्या तुलनेत सोन्याचा भाव तब्बल 24926 रुपयांनी म्हणजेच साधरण 25000 हजार रुपयांनी कमी झाला आहे.

3 / 5

सोन्याचा 17 फेब्रुवारी रोजीचा जीएसटसह भाव 155730 रुपये नोंदवला गेला. प्लॅटिनम या मौल्यवान धातूमध्येही 2842 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. सोमवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 154098 रुपये प्रति 10 ग्रॅम (विना जीएसटी) होता.

4 / 5

मंगळवारी म्हणजेच 17 जानेवारीज 22 कॅरेट सोन्याचा भावदेखील 2659 रुपयांनी कमी झाला आहे. 22 कॅरेट सोन्याच भाव 138495 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत घसरला आहे. सध्याची घसरण लक्षात घेता भविष्यात सोन्याचा भाव वाढणार की कमी होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

5 / 5

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us