Gold Price Hike : सोन्याचा भाव थेट रॉकेट, सराफा बाजारात खळबळ, 10 ग्रॅमची किंमत चक्क पोहोचली…

जळगाव हे शहर सुवर्णनगरी म्हणून ओळखले जाते. येथील सराफा बाजारात सोनं महागलं आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्या चांदी दरात मोठी वाढ झाली आहे.

| Updated on: Nov 02, 2026 | 9:51 PM
1 / 5
सोन्याचे दागिने प्रत्येकालाच आवडतात. गेल्या काही वर्षांत पाहायचे झाल्यास सोन्याचा भाव वाढतच असल्याचे आपल्याला दिसून येईल. परंतु अलिकडे सोन्याचा भाव चांगलाच घसरतोय.

सोन्याचे दागिने प्रत्येकालाच आवडतात. गेल्या काही वर्षांत पाहायचे झाल्यास सोन्याचा भाव वाढतच असल्याचे आपल्याला दिसून येईल. परंतु अलिकडे सोन्याचा भाव चांगलाच घसरतोय.

2 / 5

पुढच्या काही दिवसांत सोनं असंच घसरणीला लगावं, अशी भावना सामान्यांकडून व्यक्त केली जात होती. परंतु आता सोन्याने सर्वांनाच थक्क करून टाकलं आहे. सोने तसेच चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंची भाव वाढलेला आहे.

3 / 5

जळगाव हे शहर सुवर्णनगरी म्हणून ओळखले जाते. येथील सराफा बाजारात सोनं महागलं आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्या चांदी दरात मोठी वाढ झाली आहे.

4 / 5

एकाच दिवसात सोन्याच्या दरात 2 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात 4 हजारांची वाढ झाली आहे. या वाढीसह सोन्याचा दर जीएसटीसह 1 लाख 43 हजार 685 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे.

5 / 5

तर चांदीचा भाव जीएसटीसह 1 लाख 91 हजार 580 रुपये प्रति किलो रुपये झालाय. आज दिवसभरात सोन्याच्या दरात सलग तिसऱ्यांदा वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनं घसरणीला लागलं होतं. आता सोन्याचा भाव वाढलाय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us