Gold Rate : बापरे बाप! सोनं चांदीने झोपच उडवली, भाव थेट रॉकेट, 10 ग्रॅमच्या दागिन्यासाठी खिसा खाली होणार!
परंतु शुक्रवारी सोन्याचा भाव चांगलाच वाढताना पाहायला मिळाला. सोन्याचा भाव शुक्रवारी वाढला. आठवड्याच्या शेवटच्या चालू सत्रात म्हणजेच शुक्रवारी सोनं 400 रुपयांनी महागलं. तर चांदीच्या भावात तब्बल 5000 रुपयांची वाढ पाहायला मिळाली.

सोने आणि चांदीच्या भावात रोजच चढ-उतार होताना पाहायला मिळत आहे. सध्या तर जागतिक पातळीवरील स्थिती बदलल्याने या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत घसरण होताना पाहायला मिळत आहे. शनिवार आणि रविवार बाजार बंद असतो.

परंतु शुक्रवारी सोन्याचा भाव चांगलाच वाढताना पाहायला मिळाला. सोन्याचा भाव शुक्रवारी वाढला. आठवड्याच्या शेवटच्या चालू सत्रात म्हणजेच शुक्रवारी सोनं 400 रुपयांनी महागलं. तर चांदीच्या भावात तब्बल 5000 रुपयांची वाढ पाहायला मिळाली.

राजधानी दिल्लीत शुक्रवारी (10 जुलै) सराफा बाजारात 99.9 शुद्धतेच्या सोन्याचा भाव 400 रुपयांनी वाढला. या तेजीसह सोन्याचा भाव 1,48,500 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचली. गुरुवारी हाच भाव 1,48,100 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

शुक्रवारी दिल्लीमध्ये चांदीचा भाव तब्बल 5,000 रुपयांनी वाढला. या वाढीसह चांदीचा भाव 2,37,000 रुपये प्रति किलोवर पोहोचला. गुरुवारी हाच भाव 2,32,000 रुपये प्रति किलो एवढा होता.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)