Gold Rate : सोन्याचा भाव धडाम् होणार, 10 ग्रॅम सोनं फक्त 1.20 लाखांना, वाचा भाकित काय?
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 3,800 डॉलर्स प्रति औंसच्या खाली गेल्यास सोन्याचा भाव 1.30 लाख ते 1.20 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत घसरू शकतो. चांदीचा भावही 1.55 लाख ते 1.48 लाख रुपये प्रति किलोपर्यंत कमी होऊ शकतो.

सोनं आणि चांदी हे दोन मौल्यवान धातू आहेत. या दोन्ही धातूंमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो, असे भारतीयांना वाटते. सध्या जागतिक पातळीवरील घडामोडींमुळे सोन्याचा भाव कधी वाढतोे तर कधी कमी होतो. दरम्यान, आता सोन्याचा भाव भविष्यात खूपच कमी होऊ शकतो, असा एक तर्क लावला जातोय. आगामी काळात भारतात सोनं चक्क 1.25 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत कमी होऊ शकतं, असा एक अंदाज लावला जातोय. हे कसे शक्य आहे, ते जाणून घेऊ या.
अमेरिकेतील महागाई आणि अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हकडू रेपो रेट वाढवला जाण्याची शक्यता यामुळे सध्या जागतिक पातळीवर सोने आणि चांदीच्या दरात घसरण होत आहे. डिसेंबर 2026 मध्ये फेडरल रिझर्व्ह बँकेची बैठक होणार आहे. या बैठकीत फेडरल रिझर्व्ह रेपो रेट वाढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हीच बाब लक्षात घेता SEBI रजिस्टर्ड मार्केट एक्सपर्ट अनुज गुप्ता यांनी काही अंदाज व्यक्त केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात 3,800 डॉलर प्रति औंस हा स्तर महत्त्वाचा सपोर्ट आहे. हा सपोर्ट ओलांडल्यानंतर सोन्याचा भाव 3400 ते 3350 डॉलर प्रति औंसपर्यंत घसरू शकतो. चांदीसाठी प्रति औंस 50 डॉलर आणि 48 डॉलर ही महत्त्वाची आधार पातळी आहे. ही पातळी ओलांडली तर चांदीची किंमत प्रति औंस 42 डॉलर आणि अगदी 40 डॉलरपर्यंतही घसरू शकते.
सोबतच आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 3,800 डॉलर्स प्रति औंसच्या खाली गेल्यास सोन्याचा भाव 1.30 लाख ते 1.20 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत घसरू शकतो. चांदीचा भावही 1.55 लाख ते 1.48 लाख रुपये प्रति किलोपर्यंत कमी होऊ शकतो.
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)