
जळगावच्या सराफ बाजारात एका दिवसात सोन्याचे दर 500 रुपये तर चांदी 1 हजाराने घसरली. सोन्याचे दर जीएसटीसह 89 हजार 198 रुपये तर चांदीचे दर 97 हजारावर पोहोचले आहेत

ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर वाढलेला भू-राजकीय तणाव, डॉलरच्या तुलनेत कमकुवत रुपया , वाढती महागाई व शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्यातील गुंतवणूक वाढत आहे

परिणामाने सोन्याची मागणी आणि पर्यायाने सोन्याचे भाव वाढत आहे. यावर्षी सोन्याचे भाव 90 हजार रुपये तोळ्यापर्यंत पोहोचू शकतो असा जाणकारांचा अंदाज आहे.

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 86,647, 23 कॅरेट 86,300, 22 कॅरेट सोने 79,369 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 64,985 रुपये, 14 कॅरेट सोने 50,689 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 95,769 रुपये इतका झाला.

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल

गेल्या पाच वर्षांत सोन्याने ग्राहकांना, गुंतवणूकदारांना 18% वार्षिक परतावा दिला आहे. तर याच दरम्यान निफ्टीने वार्षिक जवळपास 15 टक्क्यांची झेप घेतली आहे.