Gold-Silver Rate Today 21 March 2026 : ही सुवर्णसंधी सोडू नका, धाडकन कोसळले सोन्याचे भाव, आज सोनं घ्याच नाहीतर… 10 ग्रॅमसाठी फक्त …
Gold-Silver Rate Today 21 March 2026 Latest News Updates in Marathi : लग्नसराईच्या मोसमात सोन्याच्या खरेदीला उत्साह येतो, पण सध्या सोनं-चांदी सातत्याने वरखाली होत आहे. या वीकेंडला, सोन्याचे, चांदीचे दर किती आहेत ? घ्या जाणून पटापट

संपूर्ण जगाला युद्धाच्या झळा बसत असून तणाव जाणवत आहे. जगात अशांतता असून बाजारात मात्र मौल्यवान धातू असलेल्या सोन्या-चांदीच्या दरात सतत चढउतार सुरू आहेत. पाडव्याच्या दिवशी सोनं कोसळल होतं, तर काल याच सोन्याचे भाव पुन्हा वाढलेले दिसले. पण आज, वीकेंडला सोन्याचा भाव काय आहे, सोनं खरेदी करता येण्यासारखे दर आहेत का ?

जळगावच्या सराफ बाजारात सोने चांदीच्या दरात घसरण सुरू आहे. गेल्या चोवीस तासात सोन्याच्या दरात तब्बल 4 हजार रुपयांची घसरण झाली आहे. तर चमकणार धातू चांदीही मागे कसा राहील, चांदीचे दरही एकूण 6 हजार रुपयांनी घसरले आहेत.

आज सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 48 हजार 320 रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 36 हजार 900 रुपये इतके आहेत.

युद्धाची तीव्रता अशीच कायम राहिली तर सोने चांदीच्या दरात अजूनही घसरण होण्याचा अंदाज सुवर्ण व्यासायिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे ग्राहकांना मात्र मोठा दिलासा मिळू शकतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेले आहेत.)