
सोन्यापेक्षा सध्या चांदीच्या दरवाढीची चर्चा आहे. चांदीने गेल्या काही दिवसात मोठी झेप घेतली आहे. चांदीचे दर पुन्हा नव्या विक्रमी उंच्चाकांवर पोहोचले आहेत.

जळगावच्या सराफ बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच चांदीच्या दराने १ लाख १० हजारांचा आकडा पार केला आहे. चांदीचे दर जीएसटी सह १ लाख १० हजार ४१६ रूपयांवर पोहचले आहे

गेल्या आठ दिवसात चांदीच्या भावात ९ हजार २०० रूपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची चांदी झाली आहे.

सोन्याच्या भावात ३०० रूपयांची वाढ झाली असून सोन्याचे दर जीएसटी सह ९८ हजार ३९५ रूपयांवर पोहोचले आहे.

तर गुडरिर्टन्सनुसार, गेल्या दोन दिवसात चांदीत दोन हजारांची वाढ झाली आहे. एक किलो चांदीचा भाव आता १ लाख ९ हजार रुपये इतकी आहे.

गुडरिर्टन्सनुसार, सोन्याच्या दरात ८२० रुपयांची वाढ झाली आहे. आता २४ कॅरेट सोन्याचा दर ९८,५५० रुपये आणि २२ कॅरेट सोन्याचा भाव ९०,३५० रुपये इतकी आहे